Home Legal Court । महिलांकडे एकटक पाहत राहणं म्हणजे विनयभंग

Court । महिलांकडे एकटक पाहत राहणं म्हणजे विनयभंग

609

मुंबई ब्युरो : स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग असल्याचं ठरवत औरंगाबाद सत्र न्यायालयानं एका रोड रोमिओला सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तरुणींना तसेच लहान मुलींनाही अशा सडकछाप रोड रोमिओंच्या जाचाला नेहमीच तोंड द्यावं लागतं. अनेकदा मुली कुणालाही न सांगता, गुपचूप हा त्रास सहन करतात. मात्र औरंगाबाद सत्र न्यायालयाच्या या निकालामुळं अशा पीडित मुलींना बळ मिळणार आहे. पुढे येऊन तक्रार केली तर अशा रोड रोमिओंना कायदेशीर मार्गानं धडा शिकवता येतो, हेच या निकालानं स्पष्ट केलं आहे.

काय होती घटना?

एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला छळत असलेल्याचा आरोप ठेवत साल 2017 मध्ये या आरोपीला अटक केली होती. ही मुलगी शाळेत जात असताना हा आरोपी सतत तिचा पाठलाग करायचा. तसेच तिच्या नजरेत येण्यासाठी सतत तिच्या घरासमोरील बगीच्यात बसून ती सायकल चालवत असताना तिला एकटक पाहत बसायचा. एकदा ती मुलगी तिच्या मामाच्या घरी गेली होती. तेव्हा तिथंही या रोड रोमिओनं तिथंही तिची पाठ सोडली नाही. तेव्हा मामानं आपल्या मित्रांनी मदतीनं या रोड रोमिओला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

कोर्टात चाललेल्या खटल्यात काय झालं
  1. औरंगाबाद पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड विधान आणि ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
  2. या खटल्यात एकूण 6 साक्षीदारांनी कोर्टात दिलेल्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
  3. त्यानुसार या अल्पवयीन मुलीला एकटक पाहिल्याबद्दल औरंगाबादचे विशेष कोर्टाचे न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी दामोदर राबडा या रोड रोमिओला 6 महिने सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
Previous articleNagpur | नाना पटोले के नगरागमन पर कांग्रेस का शक्ति प्रदर्शन
Next articleपंचायत राज समिती च्या भेटीदरम्यान स्फोटाचे वृत्त अफवा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).