Home Maharashtra “ज़ोर जुल्म की टक्कर में, संघर्ष हमारा नारा है” राष्ट्रवादी या भूमिकेवर...

“ज़ोर जुल्म की टक्कर में, संघर्ष हमारा नारा है” राष्ट्रवादी या भूमिकेवर ठाम राहणार

राष्ट्रवादी युवक कांग्रेस नेते फैजान मिर्ज़ा यांचे वक्तव्य

नागपुर ब्युरो : राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य फैजान मिर्ज़ा म्हणतात कि “ज़ोर जुल्म की टक्कर में, संघर्ष हमारा नारा है” राष्ट्रवादी या आपल्या भूमिकेवर नेहमीच ठाम राहणार.

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील आज संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा करत आहेत. त्या दौर्‍यात त्यांनी प्रत्येक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या तसेच बेरोजगार युवकांच्या पाठीशी उभे राहण्याचे आदेश दिले आहे. आज रोजी शेतकऱ्यांच्या विषयी देशात जी परिस्थिती आहे त्या विषयावर त्यांनी फार चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जिवाचे रान करेल.

फैजान मिर्ज़ा म्हणतात जयंत पाटील आमचे नेते आहेत त्यांनी आपल्या दौऱ्यात शेतकऱ्यांना न्याय देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याबाबत मार्गदर्शन केले. आम्ही राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे सर्व पदाधिकारी खंभीर पणे त्यांना साथ देत राहू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here