Home Health Nagpur । मनपाचे अधिकारी, कर्मचारी 4 ला सायकल रॅली काढून करणार कर्करोग...

Nagpur । मनपाचे अधिकारी, कर्मचारी 4 ला सायकल रॅली काढून करणार कर्करोग जनजागृती

415
0

नागपूर ब्यूरो : गुरूवारी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सायकल रॅली काढून कर्करोग जनजागृती करणार आहेत. सकाळी 9.30 वाजता मनपाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सायकलने आकाशवाणी चौक येथे जमा होतील व त्यानंतर सर्व रॅलीद्वारे मनपा मुख्यालयात पोहोचतील.

रॅलीनंतर मनपा मुख्यालयात ज्येष्ठ ऑन्कोलॉजिस्ट कर्करोगबद्दल माहिती देतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. विशेष म्हणजे, मनपाचे अधिकारी व कर्मचारी दर महिन्याला सायकल चालवून मनपामध्ये पोहोचतात व याप्रसंगी जनजागृती सुद्धा केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here