Home Education Maharashtra | मराठा आरक्षणविरोधी याचिकाप्रकरणी एमपीएससीच्या प्रदीप कुमारांची उचलबांगडी

Maharashtra | मराठा आरक्षणविरोधी याचिकाप्रकरणी एमपीएससीच्या प्रदीप कुमारांची उचलबांगडी

674

एमपीएससीची धुरा आता स्वाती म्हसे पाटलांच्या हाती

मुंबई ब्युरो : ठाकरे सरकारला अंधारात ठेवून मराठा आरक्षणविरोधी सर्वोच्च न्यायालयात एमपीएमससीमार्फत परस्पर याचिका दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्यात आली आहे. प्रदीप कुमार यांना हटवून त्यांच्या जागी स्वाती म्हसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत सुनावणी सुरु असतानाच एमपीएससीने परस्पर याचिका दाखल केली होती. या प्रकरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीसह अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. सरकारला अंधारात ठेवून एमपीएससीने परस्पर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांची निवड रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु आता एमपीएससीने वकिलांना ही याचिका मागे घेण्यास सांगितलं आहे.

9 सप्टेंबर 2019 रोजी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्याच्या आधीच्या मराठा आरक्षण लाभावर परिणाम होणार नाही असं सुप्रीम कोर्टानं तेव्हा म्हटलं होतं. पण एमपीएससीच्या काही जागाचे निकाल जाहीर होऊन नियुक्त्या देणे मात्र बाकी होतं. या नियुक्त्या कोरोनामुळे रखडल्याने काही विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. एकीकडे आमच्या नियुक्त यांना परवानगी द्यावी ही याचिका सुप्रीम कोर्टात या विद्यार्थ्याने दाखल केली आहे. त्यावेळी तुमच्या सोबत राहू असा विश्वास सरकारने दिला होता. मात्र त्याच वेळी एमपीएससीने दुसरी याचिका कोर्टात दाखल केली होती. ज्यात हा निकाल रिवाईज करण्याची परवानगी मागितली होती. त्यासाठी या निकालतला मराठा आरक्षण लाभ वगळण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाकडे एमपीएससीने मागितली होती.

जाणीवपूर्वक याचिका दाखल केली का हे तपासणार : अजित पवार

एमपीएससी स्वतंत्र आहे, त्यांना स्वायत्तता आहे. यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. राज्यात महत्त्वाचा विषय सुरु असताना याचिका दाखल करायला नको होती. परंतु एमपीएसीसीच्या याचिकेविषयी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना माहिती घेण्यास सांगितलं आहे. या संदर्भात मुख्य सचिव माहिती घेतील. सर्व माहिती घेतल्यानंतर कोणी जाणीवपूर्वक याचिका दाखल केली आहे की आणखी काही हे स्पष्ट होईल. एमपीएससी संदर्भात आम्ही योग्य मार्ग काढू, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

Previous articleNagpur | … और दो दिनों में कट गया पुलिस वाहन का चालान
Next articleअपघातास जबाबदार असलेल्यांवर पालकमंत्री सुनील केदार यांचे कारवाईचे निर्देश
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).