Home Crime Gondia | उमरपायली-जुणेवाणी जंगलातून नक्षलसाहीत्य व स्फोटके जप्त

Gondia | उमरपायली-जुणेवाणी जंगलातून नक्षलसाहीत्य व स्फोटके जप्त

691

एक भलमार बंदूक, जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा सापडल्या

गोंदिया ब्युरो : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली- जुणेवाणी जंगलातून पोलिसांनी नक्षलसाहीत्य आणि स्फोटके जप्त केली. ही कारवाई आज सायंकाळी केशोरी व गोंदिया पोलिसांनी केली.

प्राप्त माहीतीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केशोरी परिसरातील उमरपायली-जुणेवाणी जंगलात नक्षलवाद्यांनी स्फोटके पेरून ठेवले असल्याची गुप्त माहिती मिळाली. याच आधारावर त्यांनी या परिसरात कोबिंग आँपरेशन राबविले. यात उमरपायली -जुणेवाणी जंगलात पहाडी लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि, एक भलमार बंदूक, जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा सापडल्या.

बीडीएस पथकाच्या मदतीने राबविलेल्या शोध मोहीमेत एका डरममध्ये युरिया खत, 500 ग्रम निरमा पावडर,एक स्विच बटन, लाल रंगाची वायर,चार लाख चाळीस हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या नोटा, गंधक 10 ग्रम, कापूरवडी,एक भरमार बंदूक आदी साहित्य जप्त केले. याप्रकरणी केशोरी पोलिसांनी भांदवीच्या कलम 370 सहकलम 17, 18,20,23 युएपीए सहकलम 4,5 भारतीय स्फोटके पदार्थ कायदा व भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

Previous articleबाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यानामध्ये बनणार ‘गोंडवाना थीम पार्क’ : वनमंत्री संजय राठोड
Next articleChandrapur | कुटुंबासह मास्टर ब्लास्ट सचिन ताडोबात दाखल
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).