Home Maharashtra Nagpur | गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नको

Nagpur | गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नको

472
0

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जाळण्यात येणार अध्यादेशाच्या प्रती

नागपूर ब्यूरो : गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे नाव बदलून स्व.बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले आहे, विदर्भातील प्राणी संग्राहलयाला विदर्भातील कोणत्याही नेत्याचे नाव दिले तरी चालेल परंतु विदर्भ विरोधी नेत्याचे नाव नको, अशी भूमिका घेत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने या शासकीय अध्यादेशाचा विरोध करण्यात येत आहे.

गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे नाव बदलून स्व.बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात येत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र शासनाचा तातळीने काढलेला सरकारी अध्यादेश (GR) विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज बुधवार, 20/1/2021 च्या दुपारी:- 1:30 वाजता, मुख्य कार्यालय 214, गिरीपेठ, पुराना आर.टी.ओ जवळ जाळण्यात येणार आहे. अशी माहिती युवा आघाडी नागपूर विभाग, विदर्भ राज्य आंदोलन समिती चे अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here