Home Maharashtra Nagpur | मनपाला ‘स्टार म्यूनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार प्रदान

Nagpur | मनपाला ‘स्टार म्यूनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार प्रदान

980

 

‘अर्थ डे नेटवर्क’कडून मिळाला सन्मान

नागपूर ब्यूरो : पौर्णिमा दिनानिमित्त नागपूरकरांना ऊर्जा बचतीचा संदेश देणा-या नागपूर महानगरपालिकेचा ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ कडून सन्मान करण्यात आला आहे. ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ कडून ‘ऊर्जा बचत’ गटातील यंदाचा ‘स्टार म्यूनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार नागपूर महानगरपालिकेला प्रदान करण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेने पौर्णिमा दिनी ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकायार्ने सुरू केलेल्या उपक्रमाची ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ने दखल घेतल्याने मनपाचा देशात नाव लौकीक झाला आहे. मनपाच्या या यशाबद्दल महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्य करणा-या सर्व स्वयंसेवकांचे व म.न.पा. कर्मचा-यांचे अभिनंदन केले.

नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने 2014 पासून ऊर्जा बचतीच्या दृष्टीने पौर्णिमा दिवस हा विधायक उपक्रम तत्कालीन महापौर व आमदार प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात हाती घेण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत प्रत्येक पौर्णिमेच्या प्रकाशात रात्री अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन करण्यात येते. त्याला प्रतिसाद देत नागरिकही या विधायक उपक्रमात सहभागी होतात. पौर्णिमेच्या रात्री ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक शहरातील विविध भागात फिरून नागरिकांना, व्यापा?्यांना अनावश्यक वीज दिवे रात्री 8 ते 9 या वेळात बंद करण्याचे आवाहन करतात. मनपा आणि ग्रीन व्हिजीलच्या या आवाहनाला शहरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 2 लाख 53 हजार 201 किलो कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ह्यमन की बातह्णमधून मनपाच्या पोर्णिमा दिन उपक्रमाचे कौतुक केले आहे.

‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ द्वारे देशातील महानगरपालिकांसाठी 10 वेगवेगळ्या श्रेणीतील ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी मनपाला स्वत: अर्ज न करता त्यासाठी शहरातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था किंवा शैक्षणिक संस्थाद्वारे नामांकन सादर करणे अनिवार्य होते. त्याअंतर्गत तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे संचालक कौस्तभ चॅटजी व सुरभी जायस्वाल यांनी ऊर्जा बचत आणि हरीत आच्छादनाचा वाढता वापर या दोन श्रेणींमध्ये नागपूर महानगरपालिकेचा नामांकन प्रस्ताव दाखल केला होता. पुरस्काराबद्दल ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’च्या भारतीय संचालक करुणा सिंग यांनी मनपाचे अभिनंदन केले व पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासासंबंधी उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

नागपूर महानगरपालिकेसह वेगवेगळ्या श्रेणींमध्ये देशातील पुरी, महाबळेश्वर, अहमदाबाद, थिरूअनंतपुरम, कोलकाता, करीमनगर, अमृतसर, दक्षिण दिल्ली आणि विशाखापट्टनम या महानगरपालिकांनाही ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ तर्फे ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने उपयुक्त उपक्रम : आयुक्त

देशातील हिरवे शहर अशी ओळख असलेले आपल्या नागपूर शहराने पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने एक उपयुक्त असा उपक्रम सुरू केला आहे. हिरवे शहर यासोबतच ऊर्जा बचत करणारे शहर म्हणूनही नागपूरने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. या यशामागे ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांद्वारे करण्यात येणारी जनजागृतीची सुद्धा मोठी भूमिका आहे. नागपूरकरांमध्ये पोर्णिमा दिनानिमित्त मागील सहा वषार्पासून जनजागृती करणा-या ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे संचालक कौस्तभ चॅटर्जी यांच्यासह त्यांच्या चमूचे मनपातर्फे अभिनंदन.

Previous articleCovid Vaccine | राज्यात 358 लसीकरण केंद्र
Next articleBeauty Tips | मेकअप एक्सपर्ट कीर्ति से जानें क्यों रेटिनॉल हैं आपकी स्किन का एंटी एजिंग फ्रेंड?
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).