Home हिंदी रविवारी सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर गाण्याची आणि शॉपिंगची मेजवानी

रविवारी सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर गाण्याची आणि शॉपिंगची मेजवानी

720

नागपूर ब्यूरो : प्रवाशांच्या सोइ करता महा मेट्रो तर्फे सातत्याने विविध उपाय केले जातात. या अंतर्गत मेट्रो ट्रेन मध्ये सायकल ने प्रवास करणे, सेलिब्रेशन ऑन व्हील्, फिडर सारख्या विविध उपाय योजना महा मेट्रो तर्फे प्रवाश्यांकरता केल्या आहेत. या सर्व योजनांना नागपूरकरांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे.

याच अंतर्गत रविवारी म्हणजे आज सुट्टीच्या दिवशी शहर भ्रमणाला निघालेल्या नागपूरवासियांकरिता महा मेट्रोने संगीताची मेजवानी ठेवली आहे. महा मेट्रो च्या सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन येथे दुपारी 12 ते 3 वाजे पर्यंत केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (CRPF) तर्फे बँड चा कार्यक्रम ठेवला आहे. तसेच संध्याकाळी 4 ते 6 दरम्यान नागपूरच्या नावाजलेल्या सचिन आणि सुरभी ढोमणे यांच्या सूर संगम संस्थेतर्फे गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महा मेट्रो च्या प्रवासी सेवेला नागपूरकर प्रतिसाद देत आहे. रविवारी हा प्रतिसाद किती तरी पटीने जास्त असतो. नागपूरकरांच्या या आपुलकीची परतफेड करण्याकरता महा मेट्रो तर्फे विविध प्रकारचे 10 स्टॉल्स देखील सीताबर्डी इंटरचेंज येथे लावण्यात येणार आहेत. यात खाण्याकरता विविध प्रकारचे, तसेच शॉपिंग करता देखील स्टॉल असतील. या शिवाय आयुर्वेदिक तसेच पर्यावरण पूरक वस्तू देखील विक्रीला असतील. नागपूरकरांनी राईड करून या सर्व सोईंचा लाभ घ्यावा, असे आवाहन महा मेट्रो तर्फे करण्यात येत आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleNagpur । शाहिद रफी ने श्रोताओं का दिल जीता
Next articleआज देश को मिलेगी बिना ड्राइवर के चलने वाली पहली मेट्रो
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).