नागपूर ब्यूरो : महाराष्ट्र शासनाने नाईट कर्फ्यू लागू केल्यानंतर या नियमांचं पालन करण्यास राज्यात सुरुवात झाली. विशेषत: हे नियम लागू करण्यात आल्यांनंतर नागपुरात याचे थेट परिणाम दिसून आले. ज्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रमही पाहायला मिळाला. रात्रीच्या वेळी असणारी संचारबंदी म्हणजे घराबाहेर पडायचंच नाही का, असा प्रश्नही अनेकांना पडला. ज्याबाबत आता पोलीस यंत्रणांकडून काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करण्यात येत आहेत.
संचारबंदी असली तरीही नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. बरं, बाहेर पडण्याची मुभा असली तरीही गर्दी करु नका असा इशाराही देण्यात आला आहे. संचारबंदीदरम्यान चारपेक्षा अधिक जण कोणत्याही ठिकाणी जमल्याचं आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असाही इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवांना संचारबंदीतून वगळण्यात आलं असल्याची बाब पोलिसांनी अधोरेखित केली. शिवाय रात्रपाळीची कार्यालयं वगळता पब, हॉटेल, सिनेमागृह अशा करमणुकीसाठी वापरली जाणारी आस्थापनं रात्री अकरा वाजता बंद करणं बंधनकारक असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.
संचारबंदीच्या या काळात नेमकी कशाला मुभा आणि कशाला बंदी?
- – नागरिकांनी पूर्णपणे घराबाहेर पडणं टाळावं अशी सक्ती नाही.
- – अत्यावश्यक किंवा इतर कारणासाठी एक- दोनजण बाहेर पडण्यास मुभा.
- – दुचाकी किंवा कारमधून प्रवास करण्यास मुभा. पण, कारमध्ये चारहून जास्त लोकं नसावीत.
- – कामावरुन घरी परतणाऱ्यांना अकरा वाजल्यानंतरही घरी परतण्यास परवानगी.
- – अत्यावश्यक सेवांतील गाड्यांना कोणत्याही बंदीची सक्ती नाही.
काही महत्त्वाचे नियम आणि सावधगिरी या दोन निकषांच्या आधारे कोरोना निर्बंधांचं पालन करावं हे मात्र पोलीस यंत्रणांना अपेक्षित आहे. नागरिकांनीही नियम सक्तीचे नसले तरी अत्यावश्यक कारण वगळता घराबाहेर पडू नये असं आवाहन सातत्यानं करण्यात येत आहे.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).