Home हिंदी Farmers Protest | कृषी कायद्याविरोधात आजपासून शेतकरी आंदोलन अधिक तीव्र

Farmers Protest | कृषी कायद्याविरोधात आजपासून शेतकरी आंदोलन अधिक तीव्र

713

मुंबई ब्यूरो : कृषी कायद्यासंदर्भात केंद्र सरकारसोबत चर्चा करुन कोणताही तोडगा निघत नसल्यामुळे आता शेतकरी आपलं आंदोलन आणखी आक्रमक करणार आहेत. शेतकरी नेत्यांच्या बैठकीत रविवार आणि सोमवारी आंदोलन आणखी आक्रमक करण्यासंदर्भात रणनिती तयार करण्यात आली आहे. शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी घोषणा केली आहे की, रविवारी ‘दिल्ली चलो’ मोर्चा सुरु करण्यात येणार असून 14 डिसेंबर रोजी शेतकरी उपोषण करणार आहेत.

शेतकरी नेत्यांनी सरकारसोबत चर्चा करण्याचा मार्ग अद्यापही खुला असल्याचंही स्पष्ट केलं आहे. त्यांनी कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं सांगत म्हटलं की, ते सरकारसोबत चर्चा करण्यासाठी तयार आहेत. परंतु, त्याआधी लागू करण्यात आलेले तीन नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी चर्चा केली जाईल. सिंघू बॉर्डरवरील संवादाता संम्मेलनाला संबोधित करताना शेतकरी नेते कंवलप्रीत सिंह पन्नू यांनी सांगितलं की, देशातील अनेक भागांतून अनेक शेतकरी येथे येत आहेत. तसेच येत्या काही दिवसांत आंदोलन आणखी आक्रमक करण्यात येणार आहे.

आज शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ मोर्चा

रविवारी सकाळी 11 वाजता राजस्थानच्या शाहजहांपूरचे शेतकरी जयपूर-दिल्ली राजमार्गावरून दिल्ली चलो मोर्चाला सुरुवात करतील. संयुक्त शेतकरी आंदोलनाचे नेते कमल प्रीत सिंह पन्नू यांनी शनिवारी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, ‘उद्या (रविवारी) 11 वाजता शाहजहांपूर (राजस्थान) येथून जयपूर-दिल्ली महामार्गावरील वाहनांना रोखण्यासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर आंदोलन करणार आहेत.’

14 डिसेंबरला शेतकऱ्यांचं उपोषण

कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी 14 डिसेंबर रोजी उपोषण करणार आहेत. शेतकरी सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उपोषण करणार आहेत. संयुक्त शेतकरी आंदोलनाचे नेते कमल प्रीत सिंह पन्नू यांनी यांसदर्भात माहिती देतांना म्हटलं की, “सर्व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि अध्यक्ष स्टेजवर 14 तारखेपासून उपोषणासाठी बसतील. आम्ही आमच्या आई आणि बहिणींसाठी या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करतो. त्यांच्यासाठी आवश्यक सोयी-सुविधांचं आयोजन केल्यानंतरच आम्ही त्यांना या आंदोलनात सहभागी करणार आहोत.”


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleUPSC IFS Main Exam | 28 फरवरी से शुरू होंगी परीक्षाएं
Next articleपीएम मोदी ने किया ट्वीट | संसद पर हमले की 19वीं बरसी आज
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).