Home हिंदी सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त जीवनदान महाअभियान रक्तदान शिबिर

सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त जीवनदान महाअभियान रक्तदान शिबिर

832

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मुंबईतील रक्तदान शिबिराचे उद्घाटन

मुंबई ब्यूरो : राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा असून अवघे दोन-तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. राज्यातील रक्ताची नितांत गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज राज्यभरात जीवनदान महाअभियान रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 20 डिसेंबरपर्यंत राज्यभरातून 25 हजार पिशव्या रक्त संकलित करण्याचा संकल्प आहे, असे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

मुंबईतील दादरस्थित टिळक भवन या काँग्रेस कार्यालयात थोरात यांच्या हस्ते आज या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मा. खा. हुसेन दलवाई, आ. राजेश राठोड, मा. आ. हुस्नबानो खलिफे, सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, राजेश शर्मा, सरचिटणीस राजन भोसले, गजानन देसाई, भाई नगराळे, प्रदेश सचिव राजाराम देशमुख, झिशान अहमद, आबा दळवी, अल नासेर झकेरिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, राज्यातील रक्ताची गरज लक्षात घेता रक्तदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच सोनियाजींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रक्तदानाचा हा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. 20 डिसेंबरपर्यंत राज्यभरात ब्लॉक स्तरावर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात केले जाणार आहे. मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते यात सहभागी होतील व रक्तदान करतील असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).