Home हिंदी ‘एक जगह जब जमा हो तीनों, अमर, अकबर, अँथनी’

‘एक जगह जब जमा हो तीनों, अमर, अकबर, अँथनी’

532
0

रायुकां प्रदेश कार्यकारिणी सदस्य फैजान मिर्जा यांचा दानवे यांना टोला

नागपूर ब्युरो : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पुणे दौºयावर असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. ‘काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेनं तयार केलेले महाविकास आघाडी सरकार म्हणजे ‘अमर, अकबर, अँथनी’ सरकार आहे, असे ते म्हणाले होते. त्यांना रायुकां प्रदेश कार्यकारिणी सदस्य फैजान मिर्जा यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

रायुकां प्रदेश कार्यकारिणी सदस्य फैजान मिर्जा दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिउत्तर देतांना म्हणतात, होय, आम्ही अमर, अकबर, अँथनी आहोच. पण लक्षात असू दया, ‘अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगह जब जमा हो तीनों, अमर, अकबर, अँथनी’.

महा विकास आघाडी सरकार संदर्भात या एक वर्षांमध्ये कित्येक प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. या आरोपांना बळी न पडता महाविकास आघाडी सरकार जनतेच्या सेवेसाठी खंबीरपणे कार्य करित आहे आणि महाराष्ट्राच्या सेवेसाठी खंबीर राहणार याची आम्हाला खात्री आहे. सध्याच्या काळात महाविकास आघाडी सरकारने अशक्याला शक्य करून दाखविले आहे.

सध्या विधान परिषद निवडणुकीचे प्रचार जोरात सुरू आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना होत आहे म्हणून भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांअगोदर महाराष्ट्र सरकारवर टिका केली होती. त्याला मिर्जा यांनी प्रतिउत्तर दिले आहे.


रीडर्स आप आत्मनिर्भर खबर डॉट कॉम को ट्वीटर, इंस्टाग्राम और फेसबुक पर फॉलो कर रहे हैं ना? …. अबतक ज्वाइन नहीं किया है तो अभी क्लीक कीजिये (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020) और पाते रहिये हमारे अपडेट्स.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here