Home हिंदी Nagpur Election । झोनल कार्यालयातही नाव शोधण्याची सुविधा : रवींद्र ठाकरे

Nagpur Election । झोनल कार्यालयातही नाव शोधण्याची सुविधा : रवींद्र ठाकरे

482
0

ग्रामीण भागातही मतदारांसाठी हेल्पलाईनची व्यवस्था

नागपूर ब्यूरो : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठीच्या मतदार याद्या व मतदान केंद्रांची माहिती मतदारांपर्यंत सुलभपणे पोहचविण्यासाठी हेल्पलाईन सुरु  करण्यात आली आहे. तसेच  शहरात मतदारांसाठी महानगरपालिकेच्या झोन कार्यालयात  मतदारांना नाव शोधण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. ग्रामीण भागात मतदारांसाठीही ही सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर मतदार संघाच्या नागपूर विभाग निवडणुकीच्या पूर्व तयारीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

नागपूर विभागात 2,01,000 मतदार, 162 मतदान केंद्र

नागपूर विभागात 2 लाख 1 हजार मतदार असून त्यासाठी 162 मतदान केंद्र आहेत. या केंद्रावर दिव्यांगाकरिता रॅम्प व व्हिलचेअरसह मतदारांना 15 प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मतदानाचे वेबकास्टींग होणार असून व्हिडिओग्राफी करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या चमूद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. 80 वर्षापेक्षा जास्त व दिव्यांग मतदारांना नमुना 12-ड पुरविण्यात येऊन 23 तारखेपर्यंत सांयकाळी अर्ज प्राप्त झाल्यावर शपथपत्र भरल्यानंतर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. बिएलओद्वारे घरोघरी जावून 80 वर्षावरील मतदारास अर्ज देण्यात येणार आहेत.

तिसरे प्रशिक्षण 30 नोव्हेंबर रोजी

निवडणुकीसाठी नियुक्त पोलिंग पार्टीचे 13 व 19 नोव्हेंबर रोजी दोन प्रशिक्षण घेण्यात आले असून तिसरे प्रशिक्षण 30 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी एस.आर. श्रीनिवासन हे निवडणूक निरीक्षक असून त्यांची करडी नजर निवडणूक प्रक्रियेवर राहणार आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर ऑब्झरर्व्हर नियुक्त करण्यात आले आहे.

मतदारांनी मतदान केंद्रावर पेन आणू नये

मतदारांनी मतदान केंद्रावर येतांना कोणतेही पेन आणू नये असे आढळल्यास त्यांचे मतदान काऊंट होणार नाही. तसेच आकडे कोणत्याही एका भाषेत असावे. ई-पिक आवश्यक असून ते नसल्यास त्याव्यतिरिक्त  इतर 9  पुरावे ग्राह्य ठरविण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here