Home हिंदी Nagpur | मास्क न लावणा-या 215 नागरिकांकडून दंड वसूली

Nagpur | मास्क न लावणा-या 215 नागरिकांकडून दंड वसूली

689

नागपूर ब्यूरो : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (18 नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 215 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 1 लक्ष 7 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी 20070 नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. 83,94,000/- चा दंड वसूल केला आहे.

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असले तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा अदयापही धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे.

बुधवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 3, धरमपेठ झोन अंतर्गत 38, हनुमाननगर झोन अंतर्गत 56 धंतोली झोन अंतर्गत 12, नेहरुनगर झोन अंतर्गत 20, गांधीबाग झोन अंतर्गत 10, सतरंजीपूरा झोन अंतर्गत 12, लकडगंज झोन अंतर्गत 10, आशीनगर झोन अंतर्गत 21, मंगळवारी झोन अंतर्गत 28 आणि मनपा मुख्यालयात 5 जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 14600 बेजबाबदार नागरिकांकडून रु 73 लक्ष वसूल करण्यात आले आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleSandip Joshi | जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कुठल्याही स्तरावर संघर्ष करणार
Next articleAkola Breaking News | मामूली विवाद को लेकर पत्नी को मौत के घाट उतारा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).