Home हिंदी Gadchiroli | पदवीधर आणि बेरोजगारांच्या समस्या गंभीर्याने सोडविणार : संदीप जोशी

Gadchiroli | पदवीधर आणि बेरोजगारांच्या समस्या गंभीर्याने सोडविणार : संदीप जोशी

780

गडचिरोली, अहेरी भागात घेतली कार्यकर्त्यांची बैठक

गडचिरोली ब्युरो : गडचिरोली, अहेरी या दुर्गम भागात बेरोजगारीची समस्या गंभीर आहे. येथे अनेक पदवीधर असून देखील त्यांना रोजगार नाही. या सुशिक्षित बेरोजगार पदवीधरांच्या समस्या गांभीर्याने सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन नागपूर पदवीधर मतदार संघाचे भाजप मित्र पक्षाचे उमेदवार नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी दिले. मंगळवारी (ता.17) त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून तेथील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.

यावेळी त्यांच्या समवेत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, प्रदेश सचिव राजेश बकाने, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे, जिल्हा महामंत्री रवीभाऊ ओल्लालवार प्रामुख्याने उपस्थित होते.

गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी शासनाच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही. याव्यतिरिक्त रोजगाराचीही मुख्य समस्या आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्यातील अनेक विकास कामे रखडली आहेत. या जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले. अनुदानित असो वा विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या समस्या, सेवानिवृत्त शिक्षकांच्या 2005 नंतरच्या पेन्शनचा विषय, अशा सर्व प्रश्नांवर काम करणे सुरू झाले असून येत्या काही दिवसात समस्या सोडवू, असेही संदीप जोशी यांनी सांगितले.

पदवीधर मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. तो कायम राखण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम केले तर विजय आपलाच आहे, असा विश्वास संदीप जोशी यांनी व्यक्त केला. संदीप जोशी यांनी अहेरी, चामोर्शी, गडचिरोली, आरमोरी, वडसा या भागात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. अहेरी येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, भामरागडचे सुनील बिश्वास, भाजपा आदिवासी आघाडी मोचार्चे प्रकाश गेडाम उपस्थित होते.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleकृषी कायद्याविरोधातील स्वाक्षरी मोहिमेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद
Next articleDiwali Milan | राकांपा का दिवाली स्नेह मिलन कार्यक्रम
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).