Home हिंदी Anil Deshmukh | गडचिरोली पोलिसांसोबत साजरी केली दिवाळी

Anil Deshmukh | गडचिरोली पोलिसांसोबत साजरी केली दिवाळी

नागपुर ब्यूरो : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिवाळी साजरी करण्यासाठी थेट गडचिरोली गाठण्याचा निर्णय घेतला आणि शुक्रवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ते थेट गड़चिरोलीच्या पातागुडम ला पोहोचले सुद्धा.

”पोलिस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मी गडचिरोलीमधल्या पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. चोवीस तास जनसेवेत असलेल्या पोलिसांचा उत्साह वाढवणे ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे घरी न थांबता मी थेट ‘फिल्ड’वर जाण्याचे ठरवले. कठीण स्थितीत सेवा करणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढवन्याचा माझा प्रयत्न आहे.  ” असे देशमुख यांनी दिवाळी च्या पूर्व संध्येलाच सांगितले होते.

“दिवाळी सारखा आनंददायी सण कुटुंबासमवेत, आप्त-मित्रांसह साजरा करावा, असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र पोलिसांना ते प्रत्येकवेळी जमत नाही. त्यामुळे कुटुंबप्रमुख म्हणून मीच त्यांच्या जवळ जाऊन चार आनंदाचे क्षण त्यांच्या आयुष्यात पेरण्याचा प्रयत्न करणार आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले होते.

नागपुरातून देशमुख दुपारी हेलीकॉप्टरने गडचिरोली येथे रवाना झाले. त्यानंतर जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या पातागुडम चा त्यांनी दौरा केला.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here