नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (13 नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 257 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 1 लक्ष 28 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी 19296 नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. 80,07,000/- चा दंड वसूल केला आहे.
शुक्रवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 28, धरमपेठ झोन अंतर्गत 54, हनुमाननगर झोन अंतर्गत 38 धंतोली झोन अंतर्गत 15, नेहरुनगर झोन अंतर्गत 19, गांधीबाग झोन अंतर्गत 14, सतरंजीपूरा झोन अंतर्गत 11, लकडगंज झोन अंतर्गत 12, आशीनगर झोन अंतर्गत 21, मंगळवारी झोन अंतर्गत 42 आणि मनपा मुख्यालयात 3 जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 13826 बेजबाबदार नागरिकांकडून रु 69 लक्ष 13 हजार वसूल करण्यात आले आहे.
प्लाज्मा दान करा : राम जोशी
प्लाज्मा देणे ही रक्तदानासारखीच प्रक्रिया आहे. कोरोनामधून मुक्त झालेल्यांनी दान केलेला प्लाज्मा अत्यवस्थ वा गंभीर कोरोना रुग्णांना दिल्या जातो. कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाज्मा दान करावे, असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.
राम जोशी कधी कोरोना बाधित नाही झाले. कोरोनाच्या काळातही ते दररोज डयूटीवर होते आणि त्यांच्यावर कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्याची जबाबदारी होती. यादरम्यान त्यांच्या शरीरात कोरोना विषाणूचा प्रतिकार करणारी प्रतिजैविके (ॲन्टिबॉडीज)तयार झाली. रक्तातील प्लाज्मा वेगळे करुन अन्य गंभीर कोविड रुग्णाला दिल्यास कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मदत करतात. त्यामुळे त्यांनी लाईफ लाईन ब्लड बँक, नीति गौरव कॉम्प्लेक्स, रामदासपेठ मध्ये जाऊन प्लाज्मा दान केला आहे. कोविडमधून बरे झालेल्या प्रत्येकाने प्लाज्मा दान करावे, असे त्यांनी आवाहन केले आहे. प्लाज्मा बँक मध्ये ॲन्टिबॉडीज तयार झाल्यानंतर प्लाज्मा दान करता येते. लाइफ लाइन ब्लड बँक चे प्रमुख डॉ. रवि वरभे यांनी अगोदर त्यांची आर.बी.डी. टेस्ट केली नंतर त्यांचा प्लाज्मा घेतला. यावेळी डॉ. रवि वरभे आणि त्यांचे सहकारी डॉक्टर उपस्थित होते.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).