Home हिंदी निवृत्तीनंतर धोनी करणार कुक्कुटपालन, 2000 पिल्लांची दिली ऑर्डर

निवृत्तीनंतर धोनी करणार कुक्कुटपालन, 2000 पिल्लांची दिली ऑर्डर

648

नवी दिल्ली ब्यूरो : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी निवृत्तीनंतर काय करणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. लॉकडाऊनदरम्यान धोनी शेतात मेहनत करत असल्याचं समोर आलं. त्यानंतर आता धोनी कुक्कुटपालनाकडेही वळला आहे. धोनी आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये कडकनाथ कोंबड्या पाळणार आहे. रांचीमधील आपल्या फार्म हाऊसमध्येच कुक्कुटपालन करणार आहे.

मध्य प्रदेशच्या एका पोल्ट्री फॉर्ममध्ये याची ऑर्डर देण्यात आला आहे. 15 डिसेंबरपर्यंत 2000 कडकनाथ पिल्लांची ऑर्डर पूर्ण करायची आहे. झाबुआ जिल्ह्याच्या थांडला ब्लॉकमध्ये राहणाऱ्या विनोद मेधा यांना याची ऑर्डर मिळालं आहे. त्यांनी सांगितलं की, “त्यांना तीन महिन्यांपूर्वी धोनीच्या फार्म मॅनेजरकडून त्यांच्याशी संपर्क केला होता. पाच दिवसांपूर्वी 2000 पिल्लांची ऑर्डर मिळाली आहे. ती 15 डिसेंबरपर्यंत रांचीला पोहोचवायची आहे.” “भारताच्या प्रसिद्ध क्रिकेटरपैकी एक असलेल्या धोनीच्या फार्ममध्ये मी कडकनाथ पक्षी पुरवणार असल्याचा मला अभिमान आहे, असंही ते म्हणाले

धोनी आपल्या 43 एकरच्या जागेत जैविक शेती करण्याचा विचार करत असल्याचं वृत्त जुलै 2020 मध्ये समोर आलं होतं. यावेळी धोनीचा एक फोटोही समोर आला होता. धोनीच्या टीमने दुग्धव्यवसायासाठी साहीवाल जातीच्या गायी ठेवल्या आहे. सोबतच तो मत्स्यव्यवसाय देखील करत आहे. आता याच जागेत बदक आणि पोल्ट्री व्यवसायही केली जात आहे.

कडकनाथ म्हणजे काय?

कडकनाथ ही कोंबड्याची एक प्रजाती आहे. या जातीचे स्थानिक नाव ‘कालामासी’ आहे, ज्याचा अर्थ काळे मांस असलेली कोंबडी. कोंबड्याची ही जात मुख्यत: मध्य प्रदेशच्या भीमांचल परिसरातील आदिवासीबहुल झबुआ जिल्ह्यात आढळतात. 2018 मध्ये छत्तीसगडसोबत कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर झाबुआने यासाठी जीआय मानांकन मिळवलं आहे. या कोंबड्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात, यामध्ये प्रथिनांचं प्रमाणही जास्त असतं. सोबतच कोलेस्ट्रोलही कमी असतं. तसंच इतर कोंबड्यांच्या तुलनेत यामध्ये चरबीही कमी असते.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleआयुर्वेद दिवस | पंतप्रधान मोदी आज दोन आयुर्वेद संस्था देशाला समर्पित करणार
Next articleDiwali Makeup | इन आसान टिप्स से पाएं दीपावली पर फेस्टिव लुक
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).