Home हिंदी Nagpur News Bulletine | मास्क न लावणा-या 205 नागरिकांकडून दंड वसूली

Nagpur News Bulletine | मास्क न लावणा-या 205 नागरिकांकडून दंड वसूली

378
0

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (11 नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 205 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 1 लक्ष 2 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी 18809 नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. 77,63,500/- चा दंड वसूल केला आहे.

बुधवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 27, धरमपेठ झोन अंतर्गत 37, हनुमाननगर झोन अंतर्गत 12, धंतोली झोन अंतर्गत 16, नेहरुनगर झोन अंतर्गत 15, गांधीबाग झोन अंतर्गत 17, सतरंजीपूरा झोन अंतर्गत 8, लकडगंज झोन अंतर्गत 10, आशीनगर झोन अंतर्गत 21, मंगळवारी झोन अंतर्गत 38 आणि मनपा मुख्यालयात 4 जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 13339 बेजबाबदार नागरिकांकडून रु 66 लक्ष 69 हजार 500 वसूल करण्यात आले आहे.


आचारसंहिता भंग करण्यासंदर्भात मनपाची कारवाई

विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त नागपूर विभागात आचारसंहिता लागू आहे. या काळात कुठल्याप्रकारची नियमांच्या विपरीत वागणूक दिसून आल्यास कारवाई सुरू आहे. नागपूर शहरामध्येही महानगरपालिकेतर्फे कारवाई केली जात आहे. त्याअंतर्गत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रचार करणारे, संस्था तथा व्यक्तींचे बॅनर, होर्डिंग हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे.

आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त मिलींद मेश्राम यांच्या नेतृत्वात पथकाद्वारे शहरात कुठेही आचारसंहितेचा भंग होऊ नये याची काळजी घेतली जात असून बुधवारी (ता.11) शहरातील दहाही झोन अंतर्गत 168 बॅनर तथा पोस्टर्स हटविण्यात आले आहेत. पदवीधर निवडणुकीसंदर्भात प्रचार करणारे संस्थांचे, व्यक्तीचे बॅनर, होर्डिंग आणि छापील किंवा मुद्रित प्रवेशद्वार आदी कुठल्याही भागात लावण्यास मनपातर्फे परवानगी नाही. ते लावल्यास आदर्श आचारसंहितेचा भंग होतो. त्याअंतर्गत मनपाची कारवाई सुरू असून सर्वाधिक बॅनर, होर्डिंग सतरंजीपुरा आणि आसीनगर झोनमधील हटविण्याची कारवाई झाली आहे.

पदवीधर मदतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरामध्ये आचारसंहिता लागू असून कुणीही नियमभंग करू नये. कुठल्याही प्रकारची प्रचारात्मक साहित्य, पोस्टर्स, बॅनर, होर्डिंग बिना अनुमतिने प्रकाशित करू नये तथा त्याचे प्रदर्शन करू नये, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here