Home हिंदी नागपूर न्यूज बुलेटिन । नरेंद्रनगर परिसरात कार नाल्यात कोसळली

नागपूर न्यूज बुलेटिन । नरेंद्रनगर परिसरात कार नाल्यात कोसळली

674

नागपूर शहरातील नरेंद्र नगर परिसरात एक वेगवान कार येथील नाल्यात कोसळल्याची घटना घडली. हाती आलेल्या माहितीनुसार रात्री उशिरा अडीच वाजताच्या सुमारास ही कार कोसळली.

सूत्रांच्यानुसार कार मध्ये एक कपल होतं. या घटनेत कोणतीच प्राणहानी झालेली नाही. कार चा नंबर MH 31, EK 5297 आहे. सकाळी फिरायला निघालेल्या मॉर्निंग वाल्कर्स नी सर्वात अगोदर या कार ला नाल्यात बघितले, यानंतर नाल्याजवळ कार ला बघण्यासाठी एकच गर्दी उसळली.


मास्क न लावणा-या 256 नागरिकांकडून दंड वसूली

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (6 नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 256 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 1 लक्ष 28 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी 17658 नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. 71,87,000/- चा दंड वसूल केला आहे. आतापर्यंत सर्वाधिक कारवाई धरमपेठ झोन अंतर्गत करण्यात आलेली आहे. या झोन मध्ये 3571 बेजाबदार नागरिकांवर कारवाई करण्यात आली.

शुक्रवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 34, धरमपेठ झोन अंतर्गत 56, हनुमाननगर झोन अंतर्गत 30, धंतोली झोन अंतर्गत 12, नेहरुनगर झोन अंतर्गत 10, गांधीबाग झोन अंतर्गत 16, सतरंजीपूरा झोन अंतर्गत 11, लकडगंज झोन अंतर्गत 10, आशीनगर झोन अंतर्गत 23, मंगळवारी झोन अंतर्गत 50 आणि मनपा मुख्यालयात 4 जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 12188 बेजबाबदार नागरिकांकडून रु 60 लक्ष 93 हजार वसूल करण्यात आले आहे.


प्रदीप पोहाणे सह चार जणांचे आत्मसमर्पण, रविवार पर्यंत पोलीस कोठडी

NHAI कार्यालयात पारडी पुलाचे मंदगतीने होत असलेल्या कामाबाबत नगरसेवक प्रदीप पोहाणे व नागरिकांनी निवेदन दिले. यावेळी नागरिकांनी आपला रोष अधिका-यावर व्यक्त केला. कोणत्या अधिका-याशी व्यक्तिगत कुठलेही वैर नसून जनतेच्या हितासाठी हा प्रकार घडला. या प्रकरणाला पोलीस विभागाने कुणाच्या दबावाखाली इतका तुल दिला माहीत नाही, व पोलीस विभागाने महिला नगरसेविका वैशाली रोहणकर व कु.श्रुति मेंढे या मुलीला अटकेत घेऊन काय सिद्ध केले, हेच कळत नाही. शेवटी आज प्रदीप पोहाणे यांनी चार नागरिकांसह पोलीस उपायुक्त कार्यालय, परिमंडळ – 3 येथे आत्मसमर्पण केले.

आज न्यायालयात या चारही जणांना रविवार पर्यंत पोलीस कोठडी दिली तर अटक झालेल्या नगरसेविका वैशाली वैद्य व कु.श्रुति मेंढे या मुलीला जामिनावर सुटका देण्यात आली. आमचा न्यायपालिकेवर विश्वास असून येत्या काही दिवसातच नगरसेवक प्रदीप पोहाणे व अन्य यांची देखील सुटका होईल. अशी अपेक्षा आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली. सूडबुद्धीने आम्हाला दाबण्याचा कितीही प्रयत्न केला, तरीही भा.ज.प.चे नगरसेवक, पदाधिकारी अशा कारवाईला घाबरणार नाही व जनतेसाठी लढा देण्यात नेहमीच उग्र भूमिका घेतील व जनहिताच्या कामाला प्राधान्य देण्यात नेहमी अग्रणी असेल. अशी ग्वाही आमदार कृष्णा खोपडे यांनी यावेळी दिली.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).