Home हिंदी हिवाळी अधिवेशन | यंदा नागपूरऐवजी मुंबईत होण्याची शक्यता

हिवाळी अधिवेशन | यंदा नागपूरऐवजी मुंबईत होण्याची शक्यता

751

नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशन यंदा कोरोनामुळे मुंबईत होण्याची शक्यता असून त्याबाबत लवकरच विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मिळते आहे.

सूत्रांच्या मते, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाचा विषय उपस्थित करण्यात आला. ‘कोरोनाच्या वातावरणात मुंबईतून आणि राज्यातून हजारो लोक अधिवेशनासाठी नागपूरला येणे धोक्याचे आहे’, असा सूर नागपुरातच उमटत असल्याचे काही मंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अधिवेशनासाठी कागदपत्रे, मनुष्यबळ नागपूरला हलवणे आणि तेथे येणाऱ्या अभ्यागतांची मोठी संख्या याचा ताण नागपूरवर पडू शकतो. त्यामुळे अधिवेशन मुंबईतच घ्यायचे की नागपूरला यावर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत लवकर निर्णय घ्यावा असे ठरले असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप याला कोणीच दुजोरा दिलेला नाही.

समिती घेणार निर्णय : विधिमंडळ सचिव

विधिमंडळ सचिव म्हणतात की कामकाज सल्लागार समितीच अधिवेशना संदर्भात निर्णय घेईल. त्यांनी अधिवेशन नागपुरात होणार की मुंबई ला होणार, यावर भाष्य करण्याचे यावेळी टाळले. महाराष्ट्र विधान मंडळाच्या 7 डिसेंबर 2020 पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी करावयाच्या व्यवस्थेबाबत आज (शुक्रवार) नागपूर येथे विधिमंडळात आढावा बैठक झाली. तथापि, अधिवेशनासंदर्भात अंतिम निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर होणार असल्याची माहिती, विधानमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).