Home हिंदी ग्रामीण भागातील शेतकरी समुद्ध व्हावे- सुनील केदार

ग्रामीण भागातील शेतकरी समुद्ध व्हावे- सुनील केदार

748

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणार कुक्कुट वाटपाचा कार्यक्रम

नागपूर ब्यूरो : अवकाळी पावसामुळे आधीच हवालदील झालेल्या शेतकºयांना मदतीचा एक हात म्हणून जिल्ह्यातील शेतºयांना व अन्य लाभार्थ्यांना नागपूर जिल्हा परिषदेमार्फत जोडधंदा म्हणून कुक्कुट वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी व लहान शेतकरी, शेतमजूर, दारिर्द्य रेषेखालील लाभार्थी व निराधार महिलांना प्राधान्य देत आर्थिक वर्ष 2020-21 या काळात तलंगट (25+3) व 8 ते 10 आठवड्याचे कुक्कुट पोल्ट्री केजेससह वाटपाचा कार्यक्रम निर्धारित केला आहे. हा कार्यक्रम नागपूर जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्वसाधारण गटातील व आदिवासी लाभार्थ्यांना देण्यात येईल. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शेतीसोबत जोडधंदा म्हणून उपयोगात आणावे, असे प्रतिपादन सुनील केदार यांनी केले. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था या व्यवसायामुळे उंचावण्यास मदतच होईल व तरुणवर्गाच्या हाताला रोजगाराची संधी प्राप्त होईल, असेही ते यावेळी म्हणाले .

या योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी पंचायत समिती अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाने, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किंवा नागपूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात 0712-2560150 या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रथम चरणात जिल्ह्यातील 2500 लाभार्थ्यांना कुक्कुट वाटपाचा कार्यक्रम निर्धारित केला आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleकोरोना मरीजों के सामने डॉक्टर ने किया जबरदस्त डांस, ऋतिक को भाया अंदाज
Next articleप्रधानमंत्री बोले- लॉकडाउन खत्म हुआ है वायरस नहीं
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).