Home हिंदी कोविड-19 : मास्क न लावणा-या नागरिकांकडून 41 लाखाचा दंड वसूल

कोविड-19 : मास्क न लावणा-या नागरिकांकडून 41 लाखाचा दंड वसूल

774

नागपूर ब्यूरो : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवार (12 ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 209 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 1 लक्ष 4 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी 11636 नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. 41,77,000/- चा दंड वसूल केला आहे.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 24, धरमपेठ झोन अंतर्गत 40, हनुमाननगर झोन अंतर्गत 26, धंतोली झोन अंतर्गत 16, नेहरुनगर झोन अंतर्गत 12, गांधीबाग झोन अंतर्गत 16, सतरंजीपूरा झोन अंतर्गत 15, लकडगंज झोन अंतर्गत 9, आशीनगर झोन अंतर्गत 28, मंगळवारी झोन अंतर्गत 19 आणि मनपा मुख्यालयात 4 जणांविरुध्द सोमवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 6166 बेजबाबदार नागरिकांकडून रु 30 लक्ष 83 हजार वसूल करण्यात आले आहे.

नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून वचक करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणा-या नगारिकांना बचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने ही दंडाची रक्कम 15 सप्टेंबर पासून 500 रुपये करण्यात आली आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).