Home हिंदी वन मंत्री संजय राठोड यांची ट्रांझीट ट्रिटमेंट सेंटरला भेट

वन मंत्री संजय राठोड यांची ट्रांझीट ट्रिटमेंट सेंटरला भेट

470
0
  • उपद्रवी वाघीणीच्या उपचाराची घेतली माहिती

नागपूर ब्यूरो : यवतमाळ जिल्हयातील पांढरकवडा वन परिक्षेत्रातील उपद्रवी वाघीणीला नागपूर येथील रेस्क्यु सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून तीच्यावर उपचार सुरु आहेत. वन मंत्री संजय राठोड यांनी शनिवार (26 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता बालोद्यान येथील ट्रांझीट ट्रिटमेंट सेंटरला भेट दिली. जेरबंद वाघीणीच्या प्रकृती व उपचाराविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी राज्याचे प्रधान उपमुख्य संरक्षक नितीन काकोडकर, मुख्य वनसंरक्षक ( प्रादेशिक ) कल्याण कुमार यासोबत वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. भेट देवून वनमंत्री राठोड सरळ यवतमाळकडे रवाना झाले.

यवतमाळ वनवृत्ताकडून उपद्रव देणा-या या वाघीणीला गुरूवारी जेरबंद करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली होती. त्यानतंर योग्य उपचारासाठी तिला नागपूर येथील ट्रांझीट ट्रिटमेंट सेंटरला आणण्यात आले होते.


  • वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here