Home हिंदी नागपूरचा जवान काश्मीरमध्ये शहीद

नागपूरचा जवान काश्मीरमध्ये शहीद

406
0

शासकीय इतमामात आज नागपूर येथे अंत्यसंस्कार

नागपूर : जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चाडूरा भागातील बडीपुरा येथे 24 सप्टेंबर रोजी सकाळी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात नागपूर येथील नरेश उमराव बडोले शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव गुरुवारी रात्री उशिरा नागपुरात पोहोचणार आहे. उद्या शुक्रवारला सकाळी आठच्या सुमारास शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या वृत्तानुसार 24 सप्टेंबरला सकाळी अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये नरेश उमराव बडोले हे शहीद झालेत. शहीद नरेश उमराव बडोले हे नागपूर येथील हिंगणा परिसरातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्प जवळील पांडुरंग नगर येथील रहिवासी आहेत. श्रीनगर येथून त्यांचे पार्थिव दिल्ली व त्यानंतर नागपूर विमानतळावर रात्री उशिरा पोहोचणार आहे. 25 सप्टेंबर शुकवारी सकाळी 8 वाजता नंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकाºयांनी दिली आहे.

शहीद बडोले यांना ना. गडकरींची श्रद्धांजली
जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना एसआरपीएफ नागपूरचे जवान नरेश बडोले हे शहीद झाले. ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना असून देशाचे रक्षण करताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले, अशी भावना व्यक्त करीत शहीद नरेश बडोले याना आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन, एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी श्रध्दांजली अर्पण केली.

नागपूरच्या एका सुपुत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण प्राप्त झाले. एवढा मोठा आघात सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो, अशी सद्भावनाही ना. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here