Home हिंदी हायकोर्टाचे आदेश : कोरोना पॉझिटीव्हच्या हातावर स्टॅम्प लावा

हायकोर्टाचे आदेश : कोरोना पॉझिटीव्हच्या हातावर स्टॅम्प लावा

521
0

पॉझिटिव्ह असूनसद्धा नागपूर शहरात फिरतार म्हणूण दिले आदेश

नागपूर : नागपूर शहरात कोरोना पॉझिटीव्ह असणारे रुग्ण सर्रास फिरत असल्याचे आढळून आले असून त्यांना घरातच राहून उपचार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आता कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या हातावर स्टॅम्प लावण्यात यावा, तसेच कोरोना की तपासणी करणाºयांच्या बोटाला शाई लावण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विभागीय आयुक्त व महापालिका आयुक्तांना बुधवार (23 सप्टेंबर) ला दिला आहे.

कोरोना संसर्गामुळे शहरातील वाढत्या मृत्यूदराची दखल घेत उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्या. रवी देशपांडे आणि न्या. पुष्पा गनेडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा न्या. रवी देशपांडे यांनी शहरात कोरोना चे पॉझिटीव्ह असणारे रूग्ण सर्रास फिरत असल्याने कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे निरीक्षण नोंदवले. या रुग्णांनी घरात अथवा रूग्णालयात राहून उपचार घेणे आवश्यक आहे. परंतु, ते घराबाहेर खरेदी करण्यासाठी, कार्यालयीन कामासाठी जात असतील तर त्यांची ओळख पटविणे आवश्यक आहे. ते अकारण घराबाहेर जात असतील तर त्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात यावे, असे मत यावेळी त्यांनी नोंदविले.

आयुक्त म्हणाले- हे शक्य नाही
विभागीय आयुक्त व महापालिका आयुक्तांनी अशाप्रकारे लक्षणे नसणाºया पॉझिटीव्ह रूग्णांना स्टॅम्प लावता येणार नाही, असे नमूद केले. कोरोनाची लागण होणे ही सामाजिक कलंक मानल्या जातो आहे, त्यामुळे अशाप्रकारे स्टॅम्प लावल्यास त्याचा नकारात्मक परिणाम रूग्णांवर होईल, असेही दोघांनी नमूद केले. तेव्हा त्यावर न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी यांचा अभिप्राय मागितला. अ‍ॅड. धर्माधिकारी म्हणाले, करोनाची बाधा होणे आता सामाजिक कलंक राहीलेला नाही. शहरातील प्रत्येक कुटूंबातील एका सदस्याला कोरोना झाला आहे. त्यामुळे लक्षणे नसणाºयांना जर होम क्वारंटाइन ठेवायचे असेल तर त्यांच्या हातवर स्टॅम्प लावण्यात यावा, असे त्यांनी सुचवले.

आता तपासणी नंतर बोटावर शाई लावणार
हायकोर्टाने यावेळी कोरोना पॉझिटीव्हचा अहवाल प्राप्त होताच रूग्णांच्या हातावर तेव्हाच स्टॅम्प लावण्यात यावा. तसेच कोरोनाची चाचणी केल्याचीही ओळख पटावी यासाठी तपासणीसाठी जाणाºया व्यक्तीच्या बोटावर शाई लावण्यात यावी. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून 25 तारखेला कृती अहवाल सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला. न्यायालय मित्र म्हणून अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी, मनपातर्फे सुधीर पुराणिक, सरकारतर्फे दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.

ऑक्सीज़न ची साठेबाजी करणाºयांवर कारवाई करण्याचे आदेश
जीवनरक्षक औषधी आणि ऑक्सीज़नचा काही रूग्णालयांकडून अतिरिक्त साठा करून ठेवण्यात येत आहे, त्यामुळे ऑक्सीज़न व औषधांचा तुटवडा निर्माण होत असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासन आयुक्त अरूण उन्हाळे यांनी हायकोर्टात सादर केली. तेव्हा अशाप्रकारे साठेबाजी करणाऱ्या रूग्णालयांची सहआयुक्तांनी तातडीने तपासणी करावी व गरजेपेक्षा अधिक साठा आढळून आल्यास कायद्यानुसार कारवाई करावी, असा आदेशही न्यायालयाने दिला.


रीडर्स आप आत्मनिर्भर खबर डॉट कॉम को ट्वीटर, इंस्टाग्राम और फेसबुक पर फॉलो कर रहे हैं ना? …. अबतक ज्वाइन नहीं किया है तो अभी क्लीक कीजिये (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020और पाते रहिये हमारे अपडेट्स.

Previous articleवायरल वीडियो : मुंबई में कार के टायर में लिपटा था अजगर, बचा लिया
Next articleनागपुर की खूबसुरती में मेट्रो ने लगाए ‘चार चांद’
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here