-
भाजपाने बावनकुळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
नागपूर : जिल्ह्यातील पूरग्रस्तांना शासनाने घोषित केलेली मदत अत्यंत तोकडी असून पूरग्रस्तांच्या जखमेवर शासनाने मीठ चोळल्याचा हा प्रकार असल्याची टीका भारतीय जनता पार्टीने केली आहे. शासन आदेशाची भाजपतर्फे होळी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यावेळी भाजप नेत्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले.
नागपुर जिल्हयात दिनांक 27 व 28 ऑगष्ट रोजी मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुर आला. त्याचा फटका जिल्हयातील अनेक गांवाना व नदी लगतच्या क्षेत्रांना बसला असुन मोठया प्रमाणात नुकसान झाले. या नैर्सगीक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या नागरीकांना शासन आदेशा नुसार मिळणारी मदत अतिशय तोकडी असुन नागरीकांचे प्रत्यक्ष झालेले नुकसान पाहता शासनाकडुन मिळणारी मदत म्हणजे केवळ तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे. असे म्हणत आज जिल्हा भाजप च्या नेत्यांनी प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावणकुळे,जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्तांना निवेदन देवुन शासन आदेशाची होळी केली.
यावेळी त्यांचे सोबत आमदार गिरीश व्यास, आमदार अनिल सोले, आमदार समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे, डी मल्लीकार्जुन रेडडी, अशोकराव मानकर, चरणसिग ठाकुर, आंनदराव राउत, जिल्हा संघटन महामंत्री किशोर रेवतकर, महामंत्री अविनाश खळतकर, इमेश्वर यावलकर, अजय बोढारे, अनिल निधान, उकेश चौहाण, संजय टेकाडे, संध्याताई गोतमारे, संदीप सरोदे, विशाल भोसले, अंबादास उके, बबलु गौतम, आदर्श पटले, सोनबाजी मुसळे, ॲड. प्रकाश टेकाडे, मनीष वाजपेयी, राजेश ठाकरे, कमलाकर मेंघर, प्रतिभा गवळी, शुभांगी गायधने, माया पाटील, कपील गायधने, राहुल किरपान, अंजली कानफाडे, शामराव बारई, सुनील कोरडे, सुभाष गुजरकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले की, पुरामुळे वाहुन गेलेल्या घरांसाठी व घरातल्या सामानांसाठी प्रति कुटंब केवळ 5000 (पाच हजार) सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय म्हणजे पुरग्रस्त नागरीकांची क्रुर थटटा आहे. लाखो रुपयांचे सामान वाहुन गेले असतांना किंवा क्षतीग्रस्त झाले असताना ही मदत अपुरी असुन जिल्हा भाजपाच्या वतीने यापुर्वी दिलेल्या निवेदनांत प्रति कुटुंब 25 हजार देण्याची मागणी केली आहे.