Home मराठी Maha_Metro। अतिरिक्त मुख्य सचिव श्री. भूषण गगराणी आणि नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यानी केला...

Maha_Metro। अतिरिक्त मुख्य सचिव श्री. भूषण गगराणी आणि नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यानी केला मेट्रोने प्रवास

450

नागपूर ब्यूरो : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून आज अतिरिक्त मुख्य सचिव मुख्यमंत्री सचिवालय व नगरविकास विभाग (१) श्री. भूषण गगराणी यांनी झिरो माईल फ्रिडम पार्क – एयरपोर्ट साऊथ – सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रोने प्रवास केला. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी श्री.गगराणी यांचे स्वागत करत झिरो माईल फ्रिडम मेट्रो स्टेशन येथील सपनों से बेहत्तर प्रदर्शन बघत प्रकल्पाची तसेच मेट्रो सेवेची माहिती त्यांना प्रदान करण्यात आली.

महा मेट्रोच्या वतीने त्यांना मेट्रोच्या संपूर्ण कार्याची आणि प्रगतीची माहिती प्रदान करण्यात आली. नागपूर शहरामध्ये नागपूर मेट्रोच्या रूपात अतिशय चांगली वाहतूक प्रणाली तयार करण्यात आली आहे, आंतराराष्ट्रीय दर्ज्याची पायाभूत सुविधा आज नागपूर शहरामध्ये उपलब्ध आहे हे अभिमानाची बाब आहे. मेट्रो प्रवासा दरम्यान स्टेशन परिसरात प्रवाश्याची गर्दी बघून नागरिक मोठ्या प्रमाणात मेट्रोचा उपयोग करत आहे या बद्दल श्री. गगराणी यांनी महा मेट्रोला शुभेच्छा दिल्यात. मेट्रोचे तिकीट दर सर्व सामान्य व्यक्तींना परवडणारे आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे शहराच्या कुठल्याही भागातून मेट्रो स्टेशन पर्यंत नागरिकांना पोहोचता येते. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून पैसे वाचविण्यास मदत होत असून पर्यावरणराखण्यास देखील मदत होते.

नगरविकास विभागांच्या संपूर्ण टीमचा मेट्रोने प्रवास
उल्लेखनीय आहे कि, नागपूर मेट्रो रेल फेज – १ प्रकल्प प्रशासकीय पातळीवर उत्तमरित्या पूर्ण करण्याकरिता नगर विकास विभागाचा महत्वाचा वाटा होता तसेच मेट्रो रेल प्रकल्पाच्या कार्यानव्ययन होत असतांना नगरविकास विभागाची टीम या नागपूर मेट्रो प्रकल्पाशी संलग्न होती हे देखील विशेष.

या वेळी नगरविकास विभागाचे उपसचिव श्री. विजय चौधरी, सहसचिव श्रीमती प्रतिभा भदाने, श्री. सुनिल मरळे, विशेष कार्य अधिकारी श्री. चंद्रकांत उंडगे,अवर सचिव श्री. अजयसिंह पाटील, श्री. किशोर गोखले, श्री. निर्मल चौधरी,कक्ष अधिकारी श्री. रहाणे महा मेट्रोचे संचालक श्री. अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक श्री. उदय बोरवणकर यावेळी उपस्थित होते.