Home Nagpur #Nagpur । जिल्हाधिकारी व सीईओ जनतेशी आज सायंकाळी 6.30 वाजता साधणार ‘फेसबुक...

#Nagpur । जिल्हाधिकारी व सीईओ जनतेशी आज सायंकाळी 6.30 वाजता साधणार ‘फेसबुक लाईव्ह’वरून संवाद

395
नागपूर ब्युरो : जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर व सिईओ योगेश कुंभेजकर हे उद्या, बुधवार दि. 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30. वाजता फेसबुक लाईव्हवरून नागपूर जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

नागपूर जिल्ह्यातील ५० वर्षावरील पुरुष आणि महिलांची डोळ्यांची तपासणी आणि शस्त्रक्रिया प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विषयक मोहीम युद्धस्तरावर राबविण्यात येत आहे.या मोहिमेविषयी अधिक माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, आरोग्य विभागाचे अधिकारी हे जिल्हाधिकारी महोदयांसमवेत सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रसारण नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या तसेच जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या अधिकृत पेजवर पाहता येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संवादामध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाची लिंक पुढीलप्रमाणे असेल.

संवादाची लिंक : https://www.facebook.com/events/809475590169567/

Previous article#Nagpur | अनेक चुनौतियाें के बावजूद बरकरार है पत्रकारिता की विश्वसनीयता
Next article#Maha_Metro | मेट्रो के खिलौने दान उपक्रम को अच्छा प्रतिसाद, स्कूली बच्चों को खिलौने वितरित
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).