Home मराठी पंतप्रधान मोदींचे आवाहन । पोलिस कर्मचाऱ्यांसाठी देशात एकच गणवेश असावा, स्वातंत्र्याआधी केलेल्या...

पंतप्रधान मोदींचे आवाहन । पोलिस कर्मचाऱ्यांसाठी देशात एकच गणवेश असावा, स्वातंत्र्याआधी केलेल्या कायद्याचा आढावा घ्यावा

361

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांत पोलिसांसाठी ‘एक राष्ट्र, एक गणवेश’ अशी संकल्पना मांडली . मोदी म्हणाले, ‘ही संकल्पना थोपली जाऊ नये, तर तिच्यावर विचार व्हावा. पोलिसांबाबत चांगली धारणा कायम ठेवणे महत्त्वाचे आहे.’ स्वातंत्र्याआधी तयार केलेल्या कायद्याचा आढावा घ्यावा तसेच सध्याच्या संदर्भात त्यात दुरुस्ती करावी, असे आवाहनही मोदी यांनी राज्य सरकारांना केले. अंतर्गत सुरक्षा या मुद्द््यावर गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला आभासी माध्यमाने संबोधित करताना मोदी शुक्रवारी बोलत होते.सूरजकुंड येथे गुरुवारपासून दोन दिवसीय शिबिराचे आयोजन केले आहे.

गुन्हे रोखण्यासाठी स्मार्ट व्हा, ‘कॉमन टेक्नॉलॉजी’ तयार करा पंतप्रधानांनी सर्व राज्यांना गुन्हे रोखण्यासाठी सर्वोत्कृष्ट संयुक्त तंत्रज्ञान आणि परस्पर सहकार्य आवश्यक असल्याच्या मुद्द्यावर भर देत म्हटले की, स्मार्ट व्हा आणि ‘कॉमन टेक्नॉलॉजी’ तयार करा. पोलिस यंत्रणेत सुधारणा करा. गुन्हेगारीविश्वाचे जागतिकीकरण झाले आहे. गुन्हेगारांच्या दहा पावले पुढे राहण्याची गरज आहे. फाइव्ह जीच्या मदतीने फेशियल रिकग्निशन टेक्नाॅलाॅजी, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन टेक्नाॅलाॅजी, ड्रोन आणि सीसीटीव्हीशी संबंधित तंत्रज्ञानाच्या कामगिरीत अनेक पट सुधारणा होणार आहे.

Previous articleऔरंगाबादमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट, 30 जण भाजले, 10 गंभीर : छठ प्रसाद बनवताना झाली गॅस गळती
Next articleआमदार बच्चू कडूंचा इशारा । पन्नास खोके वादावर म्हणाले एक तारखेला ट्रेलर, 15 दिवस पिक्चर चालेल
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).