Home Nagpur नागपुरात नवा विक्रम; विष्णू मनोहर यांनी बनविला 2 हजार किलो चिवडा, आदिवासींना...

नागपुरात नवा विक्रम; विष्णू मनोहर यांनी बनविला 2 हजार किलो चिवडा, आदिवासींना वाटणार

521

नागपूर ब्युरो : दिवाळी आता काही दिवसांवरच आलेली आहेत. त्यामुळे आता अनेक ठिकाणी दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. दिवाळी म्हटलं की, सर्वात आधी फराळ आठवतो. लाडू, चिवडा, चकली आणि बरेच फराळाचे पदार्थ यावेळी बनवले जातात. यातच आता नागपूरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नागपुरात आज नवीन विक्रम घडला आहे आणि हा विक्रम चिवड्याशी संबंधित आहे.

प्रसिद्ध शेफ मनोहर विष्णू यांनी आज नवा विक्रम रचला आहे. विष्णू मनोहर ने आज एकाच कढईत तब्बल दोन हजार किलोंचा चिवडा बनविला. या चिवडा बनवण्यास सकाळीच सुरुवात झाली. विष्णू मनोहर यांच्या नावावर नवा विक्रम नोंदवला गेला आहे. या विक्रमाकडे नागपुरसोबतच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं.

विशेष म्हणजे हा संपूर्ण चिवडा आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ म्हणून दिला जाणार आहे. विष्णू मनोहर यांनी स्वतः हा चिवडा बनविला असून याठिकाणी ही पाककृती पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. विष्णू मनोहर यांनी मदतीसाठी काही लोकही सोबतीला घेतले होते. चिवड्यासाठी लागणारं सगळं साहित्य टाकून ते स्वतः आदिवासी बांधवांसाठी खास चिवडा बनविला गेला आहे.