नागपूर ब्युरो : गरज फाउंडेशन, नागपूर तर्फे 30 सप्टेंबर 2022 रोजी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कळमना परिसरातील हनुमान नगर चिखली नागोबा मंदिर येथे हे शिबिर दहा ते एक या कालावधीत पार पडले. सदर आयोजित कार्यक्रमाला नेत्र तपासणी शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांचा चांगलाच सहभाग मिळाला.
यामध्ये 134 लाभार्थ्यांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. तसेच या शिबिराचे नेतृत्वाची भूमिका स्वामी विवेकानंद समाज कार्य महाविद्यालयातील व्यवसायिक समाजकार्य प्रशिक्षणार्थी अनंत नागोसे आणि गरज फाउंडेशनची अध्यक्ष मिनूश्री राऊत तसेच तिरपुडे समाज कार्य महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाची कामगिरी केली
या शिबिरासाठी प. दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च अँड ह्यूमन रिसोर्सेस नागपूर, नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर क्षेत्रातील नागरिकांना नेत्रचिकित्सा लाभ मिळण्याच्या उद्देशाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियाना करिता डॉ. मोहन खरबे, अंजू बनसोड, ऋषिकेश साखरे, सलीम शेख, पंकज साहू, प्रीती वाघ यांचे प्रामुख्याने सहकार्य लाभले.
व्यवसायिक समाजकार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थी नेपाल देवारी, वैष्णवी गेडाम, सिमरन सोरटे, मनीष लेखामी, सीमा मरगडे, विद्या शेंडे, शालिनी गावडे, उज्वला पवार, साक्षी वाशीमकर, आरती मडावी, राजेश नवरे, अविनाश उर्दू, विनोद दळवी, चंद्र केतू, पल्लवी दोडके इत्यादी विद्यार्थ्यांचा सहभाग होता.