Home Nagpur दसरा मेळावा । लोकसंख्या नियंत्रण धोरण सर्वांसाठी असावे; मोहन भागवत यांचे प्रतिपादन

दसरा मेळावा । लोकसंख्या नियंत्रण धोरण सर्वांसाठी असावे; मोहन भागवत यांचे प्रतिपादन

387

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ९७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखादी महिला दसरा मेळावा कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी झाली. बुधवारी संघाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात गिर्यारोहक संतोष यादव शस्त्रपूजन कार्यक्रमात सहभागी झाल्या. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लोकसंख्या असंतुलनाचा मुद्दा मांडत म्हटले,‘भारतात समग्र लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज आहे. लोकसंख्या नियंत्रण, धर्माधारित लोकसंख्या संतुलनाकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. समग्र लोकसंख्या धोरण तयार व्हावे, ते सर्वांना समान लागू व्हावे. लोकसंख्या नियंत्रण बिघडल्याने इंडोनेशियापासून ईस्ट तिमोर, सुदानपासून दक्षिण सुदान, सर्बियापासून कोसोव्हा हे नवे देश तयार झाले.’

सरकारी नोकरीऐवजी उद्योगशीलता वाढणे गरजेचे भागवत म्हणाले, कोण घोड्यावर बसू शकते आणि कोण नाही अशा गोष्टी समाजातून हद्दपार व्हाव्यात. समाजात सर्वांसाठी मंदिर, पाणी आणि स्मशान एकच असावे. कुणाची श्रद्धेला दुखावली जाईल अशी वक्तव्ये करू नयेत.

संघाबाबत गैरसमज पसरवतात. संघ अल्पसंख्याक समाजाशी संवाद कायम ठेवेल, कारण समाज तोडण्याचा कट रचला जात आहे. सरकारी नोकरीमागे धावाल तर एवढ्या नोकऱ्या मिळू शकत नाहीत. उद्योगशीलता वाढावी. ९७ वर्षांत प्रथमच संघाच्या दसरा मेळाव्यात महिला प्रमुख पाहुण्या, शस्त्रपूजन केले

निर्णय प्रक्रियेत महिलांना सामावून घ्यावे : भागवत म्हणाले, ‘अर्धी लोकसंख्या असलेल्या महिलांना सन्मान आणि योग्य वाटा द्यावाच लागेल. जे काम पुरुष करू शकतात, ते महिलाही करू शकतात. पण जे काम महिला करू शकतात, ती सर्व कामे पुरुष करू शकत नाहीत.’ त्यांनी निर्णय प्रक्रियेत महिलांना सामावून घेण्यावर भर दिला.

Previous articleधम्मचक्र प्रवर्तन दिन । फडणवीसांची घोषणा:दीक्षाभूमी विकासाच्या 190 कोटींच्या नव्या आराखड्याला 15 दिवसांत मंजुरी
Next articleगरज फाउंडेशन । चिखली नागोबा मंदिर येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).