Home मराठी #Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची...

#Maha_Metro | डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट

417

औरंगाबाद येथील प्रकल्पाच्या स्थितीबाबत डॉ. कराड यांना दिली माहिती

नागपूर ब्युरो : महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केंद्रीय राज्यमंत्री (वित्त) डॉ. भागवत कराड यांची नवी दिल्ली भेट देत त्यांनी केंद्रीय मंत्री औरंगाबाद शहराच्या मेट्रो रेल प्रकल्पाच्या अहवाल संबंधी सविस्तर माहिती प्रदान केली. उल्लेखनीय आहे कि, महा मेट्रोला औरंगाबाद शहराकरिता मेट्रो रेल प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कार्य देण्यात आले आहे.

डॉ. दीक्षित यांनी प्रस्तावित डीपीआरच्या स्थितीबाबत डॉ. कराड यांना सादरीकरण केले. महा मेट्रोने नागपूर आणि पुणे याठिकाणी यशस्वीरीत्या प्रकल्प राबविला असून, नाशिक, ठाणे आणि वारंगल (तेलंगना राज्य) या शहरांकरिता याच प्रकारचा अहवाल तयार केला असून आता औरंगाबाद शहराकरता मेट्रो रेल प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचे कार्य सौपविण्यात आले आहे.

मुख्य म्हणजे मेट्रो रेल्वे प्रकल्पाव्यतिरिक्त आरओबी, आरयुबी सारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात महा मेट्रोचे कौशल्य बघता महा मेट्रोला नागपूर शहरामध्ये कार्यान्वित केल्याप्रमाणे मेट्रो ट्रॅकच्या समांतर चालणाऱ्या फ्लाय-ओव्हरचा प्रकल्प अहवाल देखील तयार करण्यास सांगण्यात आले आहे. दोन्ही प्रकल्पांसाठी एकत्रित डीपीआर तयार करण्यात येणार आहे. वाळूज ते औरंगाबाद येथील शेंद्रा एमआयडीसी आणि बिडकीन ते हरसूल पर्यंत मेट्रो व्हायाडक्टचा मानस आहे.

या अनुषंगाने जानेवारी २०२२ रोजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री मा.श्री भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद महानगरपालिका आणि इतर विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली होती.

औरंगाबद येथे डबल डेकर उड्डाणपूल नागपूर शहराप्रमाणे तयार करण्यात येणार आहे. महा मेट्रोने वर्धा मार्गावर बहुस्तरीय वाहतूक प्रकल्प कार्यान्वित केला असून कामठी मार्गावर निर्माण कार्य सुरू आहे. वर्धा मार्गावर तीन स्तरीय वाहतूक प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून सर्वात खाली रस्ता, त्याच्यावर उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो मार्गिका आहे.

कामठी मार्गावर ४ स्तरीय प्रकल्प महा मेट्रो द्वारे राबविण्यात येत आहे गड्डीगोदाम येथे चार-स्तरीय वाहतूक संरचनाचा समावेश आहे.ज्यामध्ये पहिले दोन स्तर म्हणून विद्यमान रस्ता आणि रेल्वे ट्रॅक आहे, त्यानंतर उड्डाणपूल आणि २४ मीटर उंचीवर मेट्रो मार्ग आहे. १३ नोव्हेंबर २०२० रोजी वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले.

Previous articleNew CDS | पूर्व डीजीएमओ लेफ्टिनेंट जनरल अनिल चौहान देश के नए सीडीएस‌ बनाए गए
Next articleकैंसर से पीड़ित बच्चों के लिए आयोजित हवाई यात्रा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).