Home Social देवता लाईफ फाउंडेशन राबविणार “एक रुपया दान, कॅन्सर मुक्त अभियान”

देवता लाईफ फाउंडेशन राबविणार “एक रुपया दान, कॅन्सर मुक्त अभियान”

नागपूर ब्युरो : 75 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त देवता लाईफ फाउंडेशनच्या वतीने आगामी 15 ऑगस्ट ला “एक रुपया दान, कॅन्सर मुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे. 15 जुलै रोजी सकाळी १०. ३० वाजता देवता लाईफ फाउंडेशनच्या धरमपेठ येथील कार्यालयातून सदर अभियानाची सुरुवात होईल. या अभियानात सतत एक महिना एक रुपया दान, कॅन्सर मुक्त अभियान राबविण्यात येणार असून नागपूर शहरातील 75 चौकांमध्ये प्रदर्शन करण्यात येणार आहे.

या पत्र परिषदेमध्ये देवता लाईफ फाउंडेशन च्या उपाध्यक्ष कस्तुरी बावणे, सचिव सुधीर बाहेती, देवदूत आचार्य श्री नरेंद्र सतीजा, सौ. सारिका पेंडसे, सौ. छाया शुक्ला, प्रताप राय हिराणी, विश्वस्त नीलिमा बावणे, चंद्रशेखर वसुले, अस्मिता बावणे, योगिता महिंद, अर्चना दामके, गौरव पडोळे, दीप्ती धार्मिक, मृणेशा पिल्लेवान, अरविंद आंभोरकर, मनोहर लोखंडे आदी उपस्थित होते.
15 ऑगस्ट रोजी महारॅली

या अभियानाचे समापन आगामी 15 ऑगस्ट रोजी महारॅलीने करण्यात येईल. सकाळी नऊ वाजता जवाहर वस्तीगृह पासून ते खामला चौक (दि धरमपेठ महिला, खामला) येथे सकाळी 11 वाजता रॅलीचे समापन करण्यात येणार आहे. या महा रॅलीत कॅन्सर पीडित मुलांच्या आर्थिक नियोजनाकरिता नागपूरकरांनी फक्त एक रुपया देऊन या महा रॅलीला सहकार्य करावे असे आवाहन देवता लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे यांनी इथे आयोजित पत्र परिषदेमध्ये केले आहे.

निराधारांचा आधार – संस्थेचे ब्रिद वाक्य

देवता लाईफ फाउंडेशन ही फक्त सेवाभावी संस्था असून निराधारांचा आधार हे या संस्थेचे ब्रिद वाक्य आहे. ही संस्था कॅन्सर पीडित मुलांच्या उदरनिर्वाहाचे कार्य नागपूरला गेल्या सात वर्षापासून करीत आहे. देवता लाईफ फाउंडेशन ही समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, पीडित, रोगग्रस्त अशा समाजातील वय बारा वर्षाच्या आतील कॅन्सरग्रस्त मुला- मुलींच्या सेवेसाठी कार्यरत आहे.

Previous articleनॉन फेरस मेटल्स पर 26 वीं अंतरराष्ट्रीय परिषद 8 और 9 को
Next articleअशोक सिंह द्वारा लिखित “पद्मटंक यादव आफ देवगिरी” पुस्तक का विमोचन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).