Home मराठी Maharashtra । विदर्भात 25 जूनपासून चांगला पाऊस, कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे...

Maharashtra । विदर्भात 25 जूनपासून चांगला पाऊस, कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवली शक्यता

विदर्भात शनिवार २५ जूनपासून चांगला पाऊस येईल, अशी दाट शक्यता ख्यातनाम कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे. सध्या विदर्भात बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पाऊस येत आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत राहिल. परंतु २५ जूनपासून नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पाऊस सुरू होईल. त्यामुळे सर्वत्र चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे, असे साबळे यांनी सांगितले.

पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत उद्या सोमवार, २० जून रोजी २० ते २७ मिमी पावसाची शक्यता आहे. तर गडचिरोली जिल्ह्यांत ७० मिमी, चंद्रपूरमध्ये ११६ मिमी पाऊस येईल. पश्चिम विदर्भात उद्या वाशिम, बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत १७ ते ३० मिती पावसाची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात मात्र सोमवारी ५३ मिमी पाऊस येईल. यावेळी वारे वायव्येकडून वाहतील. सोमवारी वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ११ मिमी तर यवतमाळ जिल्ह्यांत ६४ मिमी पावसाची नोंद होईल, असे साबळे यांनी सांगितले आहे.

प्रादेशिक हवामान खात्याने विदर्भात १६ जून रोजी मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले. पण तेव्हापासून पावसाने अपेक्षित हजेरी लावलेली नाही. संपूर्ण विदर्भ अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शनिवारी काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. त्याचप्रमाणे २५ जूनपर्यंत विविध भागामध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज श्री शिवाजी महाविद्यालय, अमरावतीचे हवामान अभ्यासक अनिल बंड यांनीही कळवले आहे.

Previous article‘अग्निपथ’वरून माघार नाहीच, जूनमध्येच भरती प्रक्रिया सुरू, काही संघटनांचे आज भारत बंदचे आवाहन
Next article#Maha_Metro | 22,000 पेक्षा जास्त महा कार्डची विक्री, डिजिटल पेमेंटला चालना
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).