Home मराठी स्मार्ट नागपूर । 200 ठिकाणी सेन्सर आणि 400 स्मार्ट बिन्स लावणार; मोबाइल...

स्मार्ट नागपूर । 200 ठिकाणी सेन्सर आणि 400 स्मार्ट बिन्स लावणार; मोबाइल ॲपमधून मिळणार 49 सेवा

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे शहरात 200 ठिकाणी 400 स्मार्ट बिन्स सेन्सरसह लावण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटीचे सीईओ चिन्मय गोतमारे यांनी ही माहिती दिली.

ब्लॅक स्पॉट्स कव्हर करणे तसेच स्वच्छ भारत अभियानात नागपूर शहराचा दर्जा सुधारणे व शहराला स्वच्छ व सुंदर करण्याचा हा यामागील मुख्य उद्देश आहे. स्मार्ट स्ट्रीटवर पूर्वी लावण्यात आलेल्या स्मार्ट बिन्समध्ये आढळलेल्या त्रुट्या दूर करून चांगले बिन्स लावण्यात येतील. याचा नागरिकांना नक्कीच लाभ होईल. यासोबतच मोबाइल ॲप तयार करून 49 सेवा त्यामधून उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिस बुथ सुद्धा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूर शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी 50 ठिकाणी 100 ई-टॉयलेट्स उभारण्यात येणार आहेत. या टॉयलेट्सची शहराला मोठी आवश्यकता आहे. यावर एकूण खर्च 11.68 कोटी अपेक्षित असून लवकरच प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मनपाच्या सहकार्याने हे टॉयलेट्स उभारण्यात येतील. तसेच मनपाच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने नागपूर स्मार्ट सिटीतर्फे 3 वाचनालयांचे नुतनीकरण करून त्याला स्मार्ट ई-लायब्ररी मध्ये परिवर्तीत करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला.

शहरातील पं. दीनदयाल उपाध्याय वाचनालय लक्ष्मीनगर, कस्तुरबा वाचनालय, सदर आणि कुंदनलाल गुप्ता वाचनालय इमामवाडा या वाचनालयांचा यामध्ये समावेश आहे. नागपूर शहरातील सहा शाळांना स्मार्ट शाळा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले. मनपाच्या शाळांचे नूतनीकरण केले जाईल तसेच त्या शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक, इंटरनेट व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाईल.

Previous articleतृतीय पंथीयांसाठीच्या ‘ट्रान्सकुक’ पाककला स्पर्धेत निकिता-नेगण प्रथम, मोहिनी-सोनू, संतोषी-कलाश तृतीय
Next article‘अग्निपथ’मध्ये ‘एनसीसी’कॅडेट्सना उत्तम संधी; लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांचे वक्तव्य
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).