Home मराठी तृतीय पंथीयांसाठीच्या ‘ट्रान्सकुक’ पाककला स्पर्धेत निकिता-नेगण प्रथम, मोहिनी-सोनू, संतोषी-कलाश तृतीय

तृतीय पंथीयांसाठीच्या ‘ट्रान्सकुक’ पाककला स्पर्धेत निकिता-नेगण प्रथम, मोहिनी-सोनू, संतोषी-कलाश तृतीय

‘ट्रान्सकुक’ या तृतीय पंथीयांसाठी संपूर्ण महाराष्ट्र आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेची अंतिम फेरी बुधवारी 15 जून रोजी सिव्हिल लाईन येथील जवाहर वसतिगृहात पार पडली. यात प्रथम पारितोषिक निकिता-नेगण (पुणे), द्वितीय पारितोषिक मोहिनी-सोनू (नागपूर), तिसरे पारितोषिक, संतोषी-कलाश (पुणे) यांना घोषीत झाले आहे. परीक्षकांच्या विनंतीवरुन अजून एक काॅन्सोलेशन प्राईज मयुरी-श्रीदेवी (मुंबई) यांच्या जोडीला देण्यात आले.

अंतिम फेरीत एकूण 16 स्पर्धक सहभागी झाले होते. अंतिम फेरी 15 जून रोजी दुपारी 12 वाजता जवाहर विद्यार्थीगृह, सिव्हिल लाईन, नागपूर येथे पार पडली. अंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या स्पर्धकांची 8 जोड्यात विभागणी केली होती.

या स्पर्धकांना एक थीम दिली होती. मास्टर शेफ ऑस्ट्रेलियाप्रमाणे भाजी, किराणा व इतर साहित्य देण्यात आले होते. स्पर्धकांनी त्यातूनच वेळेवर पदार्थ तयार करायचे होते. पदार्थ तयार करण्यासाठी स्पर्धकांना दीड तासाचा कालावधी देण्यात आला होता. शेवटी दोन जोड्यांची निवड करुन त्यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय पारितोषिक देण्यात आले.

स्पर्धचे निरीक्षण विष्णू मनोहर यांच्यासोबत मैत्र्या लोवळेकर, अनुराधा हवालदार, विशाखा पवार, राधा सहस्त्रभोजनी व सुजाता नागपूरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत जेठवानी (सामाजिक कार्यकर्ता) व विजय जथे यांनी केले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डब्ल्यूसीईचे सचिन शेडगे, युनिफाॅर्म अनलिमिटेडच्या सोनिया गोरे, यश सातपुते, दत्त महाराज (उमरेड), कांदबरी (सामाजिक कार्यकर्ता, पुणे) रानी (सामाजिक कार्यकर्ता, नागपूर) आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता टीम विष्णूजी की रसोई, मिलिंद देशकर, रेणू अग्रवाल व नचिकेत जामदार यांनी परिश्रम घेतले.