Home मराठी स्पेक्ट्रम लिलाव 26 जुलैला, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते 5...

स्पेक्ट्रम लिलाव 26 जुलैला, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते 5 जी सेवा

देश लवकरच आणखी एका इंटरनेट क्रांतीचा साक्षीदार ठरणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी ४.३ लाख कोटी रुपये मूल्याच्या 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावास मंजुरी दिली. लिलाव २६ जुलैला होईल. दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, त्यानंतर देशात सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने अल्ट्रा हाय स्पीड इंटरनेटची 5 जी सेवा सुरू होऊ शकेल. त्यामुळे सध्याची इंटरनेट स्पीड 10 पटींनी वाढणार आहे. सरकारने प्रथमच मोठ्या टेक कंपन्यांना त्यांच्या वापरासाठी (कॅप्टिव्ह) 5 जी नेटवर्क स्थापनेलाही मंजुरी दिली आहे.

मंत्रिमंडळाने ट्रायची शिफारस असलेल्या आरक्षित किमतीवर लिलावास मंजुरी दिली आहे. ट्रायने मोबाइल सेवांसाठी किमान आधार मूल्यात ३९% कपातीची शिफारस केली होती. तथापि, सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सीओएआय) हे ‘अत्यंत निराशाजनक’ ठारवले होते, कारण दूरसंचार कंपन्या ९०% कपातीसाठी इच्छुक होत्या. बहुधा त्यामुळे सीओएआयने मंत्रिमंडळाच्या घोषणेनंतर वक्तव्य जारी केले नाही.

सुरुवातीला 5 जी सेवा फक्त अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनऊ, पुणे, दिल्ली आणि मुंबईत मिळेल. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, देशात 6 जी सेवा या दशकाच्या अखेरपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.

5 जी सेवा त्याच रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालते, जी 4 जीचा मोबाइल डेटा, वाय-फाय इत्यादीत वापरली जात आहे. दूरसंचार कंपन्यांना 5 जी सेवेसाठी टॉवरमध्ये बदल करावा लागणार नाही. तथापि, लहान-लहान अधिक टॉवर लावावे लागतील. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांची गुंतवणूक वाढू शकते. देशातील १३ शहरांत दूरसंचार कंपन्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेले आहे.

लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, देशात ११५ कोटींपेक्षा जास्त मोबाइल सब्सक्रायबर आहेत. 4 जी मोबाइलचे ८० कोटी आहेत. 2 जी मोबाइल सब्सक्रायबर ३५ कोटी आहेत. २०२१ मध्ये ३ कोटी 5जी मोबाइल विकले होते. त्यापैकी १ कोटी सक्रिय होते. भारतात वर्ष २०२६ पर्यंत ३५ कोटी 5 जी मोबाइल सब्सक्रायबर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous articleNAGPUR । नागपुरातील कार्तिक मोडणार तासाभरात सर्वाधिक पुशअप मारण्याचा विश्वविक्रम
Next articleविश्वविक्रम नोंदवणार । नागपुरातील कार्तिकने 1 तासात मारले 3,351 पुशअप
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).