Home मराठी 3 महिन्यांत खाद्यतेल डबा 350 रुपयांनी महागला; सूर्यफूल तेलाचे दर शेंगदाणा तेलापेक्षा...

3 महिन्यांत खाद्यतेल डबा 350 रुपयांनी महागला; सूर्यफूल तेलाचे दर शेंगदाणा तेलापेक्षा जास्त

रशिया-युक्रेनचे प्रदीर्घ काळ सुरू असलेले युद्ध, दुसरीकडे इंडोनेशियात अभूतपूर्व पामतेलाचा निर्माण झालेला तुटवडा व त्यामुळे त्या सरकारने केलेली तेलाची निर्यातबंदी या सगळ्यांचा परिणाम भारतीय बाजारातील खाद्यतेलाचे दर वाढण्यात झाला आहे. नाशिकमध्ये तर तीन महिन्यांतच खाद्यतेलाचा १५ लिटरचा डबा तब्बल ३५० रुपयांपर्यंत महागला आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच शेंगदाणा तेलापेक्षाही सूर्यफूल तेलाचे दर जास्त असल्याचे पहायला मिळत असून गेल्या पंधरा दिवसांपासून मात्र सर्वच खाद्यतेलाचे दर स्थिर असले तरी ते सामान्यांची चिंता वाढवणारे ठरत आहेत.

भारत खाद्यतेलाचा जगातील दुसरा मोठा आयातक देश असून एकूण मागणीच्या ६० टक्के खाद्यतेल आयात केले जाते. यापैकी इंडोनेशिया व मलेशियातून पामतेल तर रशिया, युक्रेन आणि अर्जेंटिना या देशांतून सूर्यफूल तेलाची आयात होते. यात, रशिया-युक्रेन युद्ध प्रदीर्घ काळ सुरू राहिल्याने सूर्यफूल तेलाची आवक ठप्प झाली आहे. तर पामतेलापैकी ६५ टक्के पुरवठा करणाऱ्या इंडोनेशियात ‘न भूतो न भविष्यती’ तेल टंचाई निर्माण झाली आहे.

तेथील नागरिकांना दोन-दोन किलोमीटर रांगा खाद्यतेलासाठी लावाव्या लागत असल्याने तेथील सरकारने पामतेलाची निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतात हॉटेल, रेस्टॉरंट‌्स‌, छोटे स्नॅक्स सेंटर्स येथे तळणासाठी सर्वात जास्त मागणी असलेले पामतेल महागले असून तेदेखील इतर तेलांच्या किमतींपर्यंत जाऊन भिडले आहे. या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे खाद्यतेलाचे दर जरी भडकल्याचे सांगितले जात आहे.

Previous articleपूर्व प्राथमिक वर्गांत खासगी शाळांत 22 लाख, तर सरकारी शाळांमध्ये 3 लाख कमी प्रवेश
Next articleमाजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे विशेष वार्ताहर म्हणून निवड
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).