Home मराठी पूर्व प्राथमिक वर्गांत खासगी शाळांत 22 लाख, तर सरकारी शाळांमध्ये 3 लाख...

पूर्व प्राथमिक वर्गांत खासगी शाळांत 22 लाख, तर सरकारी शाळांमध्ये 3 लाख कमी प्रवेश

नवी दिल्ली : देशात एका वर्षात ५२१ सरकारी शाळा बंद पडल्या, तर सहा पटीने जास्त म्हणजे ३,३०४ खासगी शाळा नवीन उघडल्या. शालेय शिक्षण विभागाच्या यूडीआयएसई (युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन) अहवालात हे स्पष्ट झालेे. २०२०-२१ मध्ये १०,३२,०४९ सरकारी व ३,४०,७५३ खासगी शाळा होत्या, तर २०१९-२० मध्ये १०,३२,५७० सरकारी आणि ३,३७,४४९ खासगी शाळा होत्या. ओडिशात बहुतांश सरकारी शाळा बंद होत्या. तेथे २०१९-२० मध्ये ५३,२६० शाळा होत्या. ज्या २०२०-२१ मध्ये ५०,२५६ राहिल्या.

– इंटरनेट : २०२०-२१ मध्ये २४.५% शाळांमध्ये पोहोचले. २०१९-२० मध्ये ते फक्त २२.३% होते. – वीज : २०१९-२० मधील ८३.४% च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये एकूण ८६.९% शाळांना कनेक्शन मिळाले. – ग्रंथालय : २०२०-२१ मध्ये ८२.९% शाळांमध्ये होते. २०१९-२० मध्ये ते २२.३% शाळांतच होते.

२०२०-२१ मध्ये देशातील कोरोना उद्रेकाचा सर्वात वाईट परिणाम लहान मुलांच्या शिक्षणावर झाला. पूर्व प्राथमिक वर्गांमध्ये २९ लाख कमी प्रवेश झाले. २०१९-२० मध्ये जिथे १,३५,५५,८९२ मुलांनी प्रवेश घेतला होता तिथे २०२०-२१ मध्ये ही संख्या १,०६,४५,५२६ पर्यंत कमी झाली. त्यापैकी २२.२८ लाख कमी प्रवेश हे खासगी शाळांतील पूर्व प्राथमिकमध्ये झाले, तर सरकारी शाळांमध्ये ३.१० लाख प्रवेश घटले. तथापि, पहिली ते १२ वीपर्यंत २०१९-२० कमी झालेली प्रवेश संख्या ७७,५८८ इतकीच आहे. २०२०-२१ मध्ये १-१२ वीच्या नवीन प्रवेशांमध्ये मुस्लिम मुलांचा वाटा १४.२६% वर पोहोचला, जो २०१९-२० मध्ये १३.९५% होता.

Previous articleगृहमंत्री वळसे पाटील । मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरू
Next article3 महिन्यांत खाद्यतेल डबा 350 रुपयांनी महागला; सूर्यफूल तेलाचे दर शेंगदाणा तेलापेक्षा जास्त
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).