Home मराठी राज्यात 18 शहरांत तापमान 42 अंश पार; खान्देश-विदर्भाची होरपळ, इतरत्र ढगाळ हवामानाचा...

राज्यात 18 शहरांत तापमान 42 अंश पार; खान्देश-विदर्भाची होरपळ, इतरत्र ढगाळ हवामानाचा अंदाज

बंगालच्या उपसागरातील असनी चक्रीवादळाने हवेतील बाष्प शोषून घेतल्याने खान्देश आणि विदर्भ अक्षरश: होरपळून निघत असून सोमवारी भुसावळ येथे सर्वाधिक ४७.२ अंश सेल्सियस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली. तर राज्यातील १८ शहरांमध्ये तापमान ४२ अंश सेल्सियसवर गेले आहे. खान्देश आणि विदर्भामध्ये आणखी दोन ते तीन दिवस हा उष्णतेचा कहर कायम राहणार आहे.

खान्देशातील तीन जिल्हे आणि विदर्भ वगळता उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि मराठवाड्यातील औरंगाबादसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात सोमवारी ढगाळ वातावरण होते मात्र उष्णताही तीव्र जाणवली. मे महिन्याचा पहिला आठवडा यंदा अधिक हाॅट ठरला आहे. ढगाळ वातावरणात देखील उष्णतेची लाट अधिक तीव्र पातळीवर आहे. परभणी, सोलापुर, ब्रह्मपुरी, अहमदनगर, वाशिम, यवतमाळ, उर्वरित. पान ३

प्रमुख शहरांतील कमाल तापमान भुसावळ ४७.२ जळगाव ४५.८ अकोला ४५.८ परभणी ४४.४ सोलापूर ४४.३ ब्रह्मपुरी ४४.२ वर्धा ४४.० अहमदनगर ४३.६ वाशीम ४३.५ यवतमाळ ४३.५ अमरावती ४३.४ चंद्रपूर ४३.४ औरंगाबाद ४३.२ गोंदिया ४३.२ नागपूर४३.१ नांदेड ४२.८ उस्मानाबाद ४२.४ बुलडाणा ४२.० सातारा ४०.० नाशिक ३९.१

Previous articleपंजाब पुलिस इंटेलिजेंस हेडक्वार्टर पर हमला:80 मीटर दूर से हुआ था अटैक
Next articleराज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांना दिलासा:सातव्या वेतन आयोगाचा थकीत हप्ता लवकरच
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).