Home Maharashtra Shaheen Hakim | राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या विभागीय अध्यक्षपदी शाहीन हकीम यांची...

Shaheen Hakim | राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या विभागीय अध्यक्षपदी शाहीन हकीम यांची निवड

नागपूर ब्युरो : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला पदाधिकारी शाहीन हकीम यांची नागपूर विभागीय अध्यक्षपदावर निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड केल्याची घोषणा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी नुकतीच केली आहे.

शाईन हकीम या राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी गडचिरोलीच्या जिल्हा अध्यक्षपदी कार्यरत होत्या. त्यांनी या पदावर असताना गडचिरोली जिल्ह्यातील महिलांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन केले. त्यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत अधिकाधिक महिलांना जोडण्याचे कार्य सुद्धा झाले. शाहीन हकीम यांच्या नेतृत्वामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीचे जाळे पसरविण्यास मदत मिळाली. त्यांनी आपल्या कार्यकाळात संपूर्ण गडचिरोली जिल्हा पिंजून काढला. केंद्र शासनाच्या विविध जनविरोधी धोरणांच्या विरोधात त्यांनी वेळोवेळी आंदोलन केली. या सर्व बाबींना बघून पक्षाने त्यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नागपूर विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वर्षा निकम यांची अमरावती विभाग अध्यक्ष म्हणून तर शाजिया जमीर शेख यांची मराठवाडा विभाग अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

मोठी जबाबदारी, प्रामाणिक कार्याची पावती मिळाली

“आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” शी बोलताना शाहीन हकीम म्हणाल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्ष म्हणून केलेल्या कार्याची पावती विभागीय अध्यक्षपदाच्या रूपाने दिली आहे. पक्षातर्फे त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आजवर गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविणे आणि पक्षाची ध्येयधोरणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केले. यापुढील काळात नागपूर विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व भागात त्या स्वतः पोहोचतील आणि या भागातील महत्त्वाच्या प्रश्नांना समजून घेतील. पक्ष आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्याशी अधिकाधिक लोकांना जोडणे हे त्यांचे मुख्य धोरण असेल. त्या म्हणाल्या पक्षाने गडचिरोलीसारख्या दुर्गम, आदिवासी जिल्ह्यातील एका प्रामाणिक कार्यकर्त्याला नागपूर विभागीय अध्यक्ष पद देऊन त्याच्या कार्याची जणू पावतीच दिली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत काम करणाऱ्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला एक दिवस पक्षातर्फे त्याच्या प्रामाणिक कार्याची पावती नक्की मिळते हे सिद्ध झाले आहे. यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचा पक्षावर अजुन विश्वास वाढेल असेही त्या म्हणाल्या.

Previous articleमहाराष्ट्र । मान्सून यंदा चार ते आठ दिवस आधीच येणार, 10 दिवस आधीच भारतात ही मोसमी पावसाचे आगमन
Next article#Nagpur | आनंदयात्री फेसबुक ग्रुप तर्फे आनंदयात्री एकांकिका स्पर्धेचे आयोजन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).