Home मराठी सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी नागपूर कनेक्शन अखेर उघड, संदीप गोडबोले मुंबई पोलिसांच्या...

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी नागपूर कनेक्शन अखेर उघड, संदीप गोडबोले मुंबई पोलिसांच्या ताब्यात

गेली दोन ते तीन दिवस पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे नागपूर कनेक्शन आहे, असे सांगितले जात होते. तेच नागपूर कनेक्शन आता अखेर उघड झाले आहे. नागपुरातील एका एसटी कर्मचाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे नाव संदीप गोडबोले असून, तो या एसटी विभागात यांत्रिक पदावर कार्यरत आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

8 एप्रिलला शरद पवारांच्या घरी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी त्यांच्याघरावर दगडफेक करत, चपला भिरकवण्यात आल्या होत्या. या राड्यानंतर राज्यभरात राजकीय खळबळ माजली होती. हा सर्व प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्या सांगण्यावरून एसटी कर्मचारी पवारांच्या निवासस्थानी

धडकले आणि त्यांनी आंदोलन केले, असा आरोप सदावर्तेवर करण्यात आला आहे. या प्रकरणी सदावर्ते कोठडीत आहेत. या प्रकरणात नागपूरच्या एका व्यक्तीने कॉल केल्याचा सांगण्यात येत होते. इतकेच नाही तर पवारांच्या घरावरील हल्ल्याचे नागपूर कनेक्शनही सांगितले जात होते. तेच नागपूर कनेक्शन आता अखेर उघड झाले आहे. नागपुरातील एका एसटी कर्मचाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पवारांच्या घरावरील हल्ल्यावेळी गोडबोले सदावर्तेंच्या संपर्कात होते, यामुळे चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हल्ल्याआधी एक बैठक झाली, नागपुरातूनही एक कॉल आला होता. नागपुरातून कुणाचा फोन आला होता, तपास करायचा आहे. फोनसंदर्भात आरोपी कोणतीही माहिती देत नाहीत, असा आरोप करण्यात आला होता. यासाठी सरकारी वकीलांनी त्यांची कोठडी मागितली होती. आणि नागपूरवरून कुणाचा कॉल आला होता, याचा तपास करायचा आहे असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात म्हटले होते. यानंतर आता नागपुरातून एका एसटी कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Previous articleआंबेडकर जयंतीचा उत्साह । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन
Next articleकुलगुरूंची बैठक । ऑफलाईन परिक्षेसाठी विद्यार्थांना एका तासामागे 15 मिनटे वाढून मिळणार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).