Home मराठी संजय राऊत । किरीट सोमय्या देशाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत?, सोमय्यांची ठाकरेंवर टीका

संजय राऊत । किरीट सोमय्या देशाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत?, सोमय्यांची ठाकरेंवर टीका

राज्याच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्री लवकरच तुरुंगात असतील, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रपरिषदेत सांगितले. यावर नागपुरात माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी “ते या देशाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत काय? असा रोखठोक सवाल केला.

सीरियल किलर, सीरियल रेपिस्टसारखे काही लोक सीरियल कम्प्लेनंट असतात. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात अशा कारवाया होत आहेत. दोन मोठी राज्ये हातातून गेल्यामुळे भाजपवाले फक्त महाविकास आघाडीच्या लोकांवर कारवाई करत आहेत. पाटणकरबाबत दीड वर्षापासून पाठपुरावा : भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी हवालाकिंग नंदकिशोर चतुर्वेदीसोबत उद्धव ठाकरेंचे नाव जोडले आहे. ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर आणि त्यांचे कारनामे यासंदर्भात मी गेल्या दीड वर्षांपासून ईडीकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे.

Previous articleकरचोरी प्रकरण । हीरो मोटर्स, कंपनीचे अध्यक्ष मुंजाल यांच्या परिसरांवर प्राप्तिकरचे छापे
Next article#Nagpur | ग्रीन विजिल ने मनाया विश्व जल दिवस
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).