Home मराठी Maharashtra | रातोरात बदलली होळीची नियमावली, यंदा होळी धुमधडाक्यात

Maharashtra | रातोरात बदलली होळीची नियमावली, यंदा होळी धुमधडाक्यात

होळी-धूलिवंदनाच्या दिवशी १० वाजेच्या आत होळी पेटवा, डीजे लावू नका, लाऊडस्पीकर हळू आवाजात लावा, अन्यथा कारवाई करू, अशा जाचक नियमावलीविरोधात विरोधकांनी आघाडी सरकारच्या नावे ‘शिमगा’ करताच गृह विभागाला २४ तासांच्या आत नियमावली बदलावी लागली. कोरोनाचे संक्रमण आटोक्यात असले वा कमी झाले असले तरी संक्रमण अद्याप सुरूच आहे हे लक्षात घेत नागरिकांनी होळी, धूलिवंदन व रंगपंचमी साजरी करताना गर्दी करू नये, असे आवाहन शासनाने केले आहे. १७ मार्च होळी, १८ मार्च धूलिवंदन आणि २२ मार्चच्या रंगपंचमीसाठी गृह विभागाने गुरुवारी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

काय आहेत नव्या मार्गदर्शन सूचना?

 1. कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतो गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणूक नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा.
 2. धूलिवंदनाला एकमेकांवर रंग टाकला, लावला जातो. परंतु, कोरोना वाढू नये म्हणून हे सण साधेपणाने साजरे करावेत.
 3. डीजे लावण्यावरही आणली होती बंदी
 4. राज्याच्या गृह विभागाने बुधवारी (१६ मार्च) पत्रक काढून होळी, धूलिवंदन व रंगपंचमीनिमित्त काही बंधने लादली होती.
 5. रात्री १० वाजेच्या आत होळी पेटवणे बंधनकारक होते.होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी होती
 6. होळी, शिमग्यानिमित्ताने (विशेषत: कोकणात) पालखी मिरवणूक काढण्यात येते. परंतु या वर्षीही पालखी घरोघरी न नेता स्थानिक मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल, यासाठी उपाययोजना कराव्यात.
 7. दहावी तसेच बारावी वर्गाच्या परीक्षा सुरू असल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई होईल. होळी साजरी करताना मद्यपान तसेच बीभत्स वर्तन केल्यास कारवाई होईल.
 8. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण तसेच संबंधित महानगरपालिका, पोलिस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी जारी केलेल्या नियमांचे पालन करावे.
 9. रंग खेळताना महिला तसेच मुलींनी खबरदारी घेण्याचे आवाहन. कोणत्याही जाती-धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नयेत.
 10. धूलिवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत, असे म्हटलेले होते.

  Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur
Previous articleराज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार नाही, संजय राऊत यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर
Next articleफिनलैंड दुनिया का सबसे खुशहाल देश | भारत की रैंकिंग 136वें स्थान पर पहुंची, पाकिस्तान 121वें रैंक पर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).