रत्नागिरी : गावात अजूनही पाहिजे तश्या सुविधा उपलब्ध नसतांना सुद्धा गावच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करुन संगमेश्वर तालुक्यातील पोचरी-धामनेवाड़ी च्या ओंकार धामणे या उच्च शिक्षित तरुणाने पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरवात केली।
‘आत्मनिर्भर भारत’ घडविन्याचे स्वप्न सत्यात उतरवन्या साठी ओंकार ने योगदान देण्यास सुरवात केली आहे। मे महिन्यात गावी आलेला ओंकार 28 दिवस कोरंटाईन होता। शाळा बंद असल्याने मुलांना शिकविन्यासाठी वर्ग सुरु करण्याची कल्पना त्याने गावातील लोकांना सांगितली। त्याची ही धडपड पाहुन गावच्या लोकांनी वाडीतील सभागृह व अन्य आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करुन दिल्या। हळूहळू मुलांची संख्या 10 वरुन 45 वर गेली।