Home कोरोना 12+ मुलांचे लसीकरण उद्यापासून; 60+ वरील सर्व ज्येष्ठांना बूस्टर डोस मिळणार

12+ मुलांचे लसीकरण उद्यापासून; 60+ वरील सर्व ज्येष्ठांना बूस्टर डोस मिळणार

केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणास मंजुरी दिली. त्यांना बुधवारपासून बायोलॉजिकल-ईची लस “कोर्बाेव्हॅक्स’ दिली जाईल. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांनाही बुधवारपासून बूस्टर डोस दिला जाईल. आतापर्यंत ६० वर्षांवरील गंभीर आजारी ज्येष्ठांना बूस्टर डोस दिला जात होता.

बूस्टर डोस “कोव्हॅक्सिन’चा आहे. ही लस १५ ते १७ वयोगटातील किशोरवयीनांना टोचली जात आहे. १२-१४ वयातील मुलांच्या लसीकरणासाठी बायोलॉजिकल-ईशी ३० कोटी डोसचा करार केला आहे. केंद्राला ५ कोटी डोस मिळाले आहेत. या वयोगटाची लोकसंख्या ७ कोटी आहे.

Previous articleव्‍याज दर घटवले तरी पीएफ खातेधारकांना मिळतो जास्त व्याज आणि सहा लाखांचा मोफत विमा
Next articleव्याख्यान व प्रकाशन सोहळा । तेलाच्या अर्थकारणाचा प्रश्न सुटेपर्यंत जागतिक राजकारणात स्थिरता अशक्य
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).