कोरोना काळात शाळांमध्ये मागील सत्राच्या तुलनेत २८.३ लाख जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. २०१९-२० मध्ये २५.१० कोटी विद्यार्थ्यांनी शाळांत प्रवेश घेतला. तर २०२०-२१ मध्ये ती वाढून २५.३८ कोटी झाली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या UDISE+ रिपोर्ट २०२०-२१ मध्ये ही आकडेवारी समोर आली. विशेष म्हणजे खासगी आणि अनुदानित शाळांतील ३९.७ लाख विद्यार्थी कोरोना काळात सरकारी शाळांत शिफ्ट झाले. यात १२.२ कोटी मुली आहेत.
११,९३३ नव्या शाळांत मुलींसाठी शौचालये उपलब्ध झाली. म्हणजे आता ९३.९१ टक्के शाळांत ही सुविधा उपलब्ध आहे. मागील वर्षी ९३.२ टक्के शाळांत ही सुविधा होती.
हात धुण्यासाठीची सुविधाही ९१.९ टक्के शाळांत मिळाली आहे. जी ९०.२ टक्के शाळांतच होती.
२०२०-२१ मध्ये ६ लाख शाळांमध्ये संगणक पोहोचला आहे. म्हणजे आता ४० टक्के शाळांमध्ये संगणक आहे. २०१९-२० मध्ये ५.५ लाख शाळांमध्ये संगणकाची सुविधा उपलब्ध होती.
इंटरनेट सुविधा असलेल्या शाळांची संख्याही ३.३६ टक्क्यांच्या तुलनेत ३.७ टक्के झाली आहे. २०२०-२१ मध्ये ८५.६ टक्के शाळांमध्ये लायब्ररी उपलब्ध झाली आहे. जी मागील वर्षाच्या तुलनेत १.६ टक्के अधिक आहे.
५७,७९९ नव्या शाळांमध्ये वीज पोहोचली आहे. आता ८४ टक्के शाळांमध्ये वीज आहे.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ९५.२ टक्के शाळांमध्ये आहे.