Home मराठी Maharashtra । अन् नंदी पाणी पीत असल्याच्या अफवेनंतर मंदिरे गच्च भरली

Maharashtra । अन् नंदी पाणी पीत असल्याच्या अफवेनंतर मंदिरे गच्च भरली

सप्टेंबर १९९५ चा तो काळ. अचानक अफवा पसरली की गणपती दूध पिऊ लागला. पाहता पाहता मंदिरे गच्च भरली आणि प्रत्येक जण मूर्तीला दूध पाजू लागला… आता २१वे शतक लागले. एक पिढी बदलली तरी शनिवारी रात्री पुन्हा अशीच बातमी आली. या वेळी गणपती नव्हे, महादेवाच्या मंदिरातील नंदी पाणी पिऊ लागला होता! समाजमाध्यमांतून राज्यभर ही अफवा पसरत गेली आणि जागोजाग नंदीला पाणी पाजण्यासाठी महादेवाची मंदिरे रात्री गच्च भरली.

दुपारपासूनच समाजमाध्यमांवर ही अफवा फिरू लागली होती. नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक, जळगाव, धुळ्यासह अनेक जिल्ह्यांतून नंदी पाणी पिऊ लागल्याच्या बातम्या येऊ लागल्या. विशेष म्हणजे दिवसभर अफवा पसरल्यावर रात्री उशिरापर्यंत लोकांचा मंदिरांकडे ओघ सुरू होता.

भगवान महादेवाचा नंदी पाणी पिऊ लागल्याचे कळताच अनेक महिलांनी पुढाकार घेत मंदिरे गाठली. चमच्याने नंदीच्या मुखाला पाणी लावताच ते शोषले जाऊ लागले. पाहता पाहता त्याच्या ध्वनिचित्रफिती व्हायरल झाल्या. पाणी अथवा कोणताही द्रव पदार्थाला आपल्या रेणुंसोबत सजातीय आकर्षण असते. यामुळे पाण्यात पृष्ठीय ताण तयार होतो. ज्यावेळी पाणी दुसऱ्या विजातीय पदार्थाजवळ नेले जाते त्यावेळी तेथे विजातीय बल तयार होते. काही रेणू त्या विजातीय पदार्थांमध्ये केशाकर्षण या बलामुळे आकर्षित होतात. पण त्या पदार्थात किंवा मूर्तीत पाण्याचे रेणू प्रवेश करत नाहीत. पाणी त्याच ठिकाणी पाहिजे त्या मार्गाने वाहत जाते. मूर्ती पाणी अथवा दूध पित नाही आणि असा कुठलाही चमत्कार नसतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ‘चमत्कार दाखवा आणि एकवीस लाख रुपये मिळवा’ असे आवाहन केले आहे. – प्रा. दिगंबर कट्यारे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस

श्रद्धा अंधश्रद्धेत कधी बदलली कळालेही नाही. रात्री उशिरापर्यंत नंदीला पाणी पाजवण्याचे प्रकार सुरू होते. हे सर्व कॅपिल अडिरा मेथड : वस्तू नळीच्या स्वरुपात असतील तर त्यात द्रवपदार्थ गुरुत्व बल याच्याविरुद्ध वरच्या दिशेने काही अंतर प्रवाहित होतात याला कॅपिल अडिरा इज मेथड असे म्हणतात. यामुळे नंदीचे मुख जर मंडळी स्वरूपात असेल तर नक्कीच पाणी वर ओढले जाईल, असे नोबेल फाउंडेशनचे जयदीप पाटील यांनी सांगितले.

सरफेस टेन्शनमुळे पाणी खेचले जाते महाराष्ट्र अंनिसचे भाविकांना आवाहन

पूर्ण भारतभर आज नंदी, महादेवाची मूर्ती ,कासव हे पाणी पितानाचा चमत्कार समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. मंदिरात भाविक रांगा लावत पाणी पाजण्याच्या चमत्काराचा अनुभव घेताना दिसत आहे. कोणतीही निर्जीव वस्तू पाणी पीत नाही हे वैज्ञानिक सत्य आहे. नंदीची मूर्ती पाणी खेचते ते केवळ पृष्ठीय ताण किंवा सरफेस टेन्शन आणि केशकर्षण या वैज्ञानिक तत्त्वामुळे. समान गुणधर्म असलेले द्रवपदार्थ जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा पदार्थाच्या थेंबाच्या वरच्या बाजूला अणुरेणूचा असलेला पृष्ठीय थर हा दुसऱ्या त्याच गुणधर्माच्या थेंबाला स्पर्श केला असता खेचला जातो. विज्ञानाच्या भाषेत याला सरफेस टेन्शन किंवा पृष्ठीय ताण असे म्हटले जाते. अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात येत असल्याचे संघटनेचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे म्हणाले.

नागपूर, औरंगाबादमध्ये अनेक मंदिरांत गर्दी!

येथील महादेव मंदिरामध्ये महिला मोठ्या संख्येने आल्या. त्यांनी फुलपात्रात दूध आणले आणि ते चमच्याने नंदीला पाजण्याचा प्रयत्न केला.

Previous articleवाद टाळण्यासाठी राजमुद्रा काढली, मोदींना शिवरायांपेक्षा मोठे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा काँग्रेसचा आरोप
Next articleओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाहीच : सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांची भूमिका
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).